'चुकलो' म्हणेन मी तर सोकावतील सारे

'चुकलो' म्हणेन मी तर सोकावतील सारे
शिक्षाच शेकडोंनी ठोठावतील सारे

उल्लेख आपले तू वेळीच टाळ आता
येताच नाव माझे भंडावतील सारे

आडून ओढणीच्या उगवेल चंद्र माझा
डोळ्यांमधून तारे डोकावतील सारे

डोक्यात आग जेव्हा पेटेल भाकरीची
करतील ज़ाळपोळी,थंडावतील सारे

सोडून साथ माझी गेली दलाल दु:खे
बाज़ार वेदनांचे मंदावतील सारे

(पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००७)

गझल: 

प्रतिसाद

आडून ओढणीच्या उगवेल चंद्र माझा
डोळ्यांमधून तारे डोकावतील सारे

सोडून साथ माझी गेली दलाल दु:खे
बाज़ार वेदनांचे मंदावतील सारे

खल्लास!

'चुकलो' म्हणेन मी तर सोकावतील सारे
शिक्षाच शेकडोंनी ठोठावतील सारे

खरय्..जमानाही ऐसा है!
जबर्दस्त!

व्वा मस्त... मतला आणि शेवटचा शेर आवडला...

गझल आवडली.

उल्लेख आपले तू वेळीच टाळ आता
येताच नाव माझे भंडावतील सारे
वा वा! छानच.