का सूर नवा हा छेडत जाते भासांची वीणा ?

का सूर नवा हा छेडत जाते भासांची वीणा ?

कोणीतरी रोज कसली ही युक्ती लढवत असते..
श्रींमंत श्रींमंत होतात नि गरिबी वाढत असते!

तो आला तो गेला हे मी नुसते बोलत असते
भेटला मला तो नाही हे कोठे सांगत असते?

का सूर नवा हा छेडत जाते भासांची वीणा ?
येशील कधी तू ते या हृदयाला उमजत असते

हा कसा शिशिर आला ते आकळे न काही बाई
शब्दांची त्याच्यासाठी मी पाने उगवत असते

कोणाला टळले आहे गडगडणे उंचीवरुनी
तो तारा आहे कळले , मी जपून वागत असते

सत्य कधी ना सांगावे कोणाला कारण त्याने
त्याला खोटेच तरी पण काय छान वाटत असते!

सर्वस्व कुठे नेले ते मज सांगितले नाही पण ..
(वार्‍याला फूल कधी का दिशा विचारत असते!)

काजळी वाढली आहे ,या वाढणार्‍या धुळीने...
बाई पहा कशी आहे; नेहमीच झटकत असते..

कोणी झाडे लावा, रोप वाढवा हे सांगत असते
तेथेच कुणी रूजलेल्या बीजाला उपटत असते

गझल: 

प्रतिसाद

श्रींमंत श्रींमंत होतात नि गरिबी वाढत असते - आजचे सामाजिक सत्य.

तो आला तो गेला हे मी नुसते बोलत असते
भेटला मला तो नाही हे कोठे सांगत असते?- वयक्तिक सल.

त्याला खोटेच तरी पण काय छान वाटत असते! - वास्तववादी ओळ

काजळी वाढली आहे ,या वाढणार्‍या धुळीने... -
बाई पहा कशी आहे; नेहमीच झटकत असते.. - आरोग्य विषयक जाग्रुती

कोणी झाडे लावा, रोप वाढवा हे सांगत असते
तेथेच कुणी रूजलेल्या बीजाला उपटत असते- वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगचे मूळ कारण.

निव्वळ समाज प्रबो धन करणारी रचना.

तो आला तो गेला हे मी नुसते बोलत असते
भेटला मला तो नाही हे कोठे सांगत असते?

का सूर नवा हा छेडत जाते भासांची वीणा ?
येशील कधी तू ते या हृदयाला उमजत असते
>>>मस्त ... हे दोन आवडले...

विशेषत: भासांची वीणा

भासांची वीणा खूपच खास!