जीवन तेंव्हा भिजत राहते

माझे दुखणे गझलांमधुनी निघत राहते
अश्रू होवुन जीवन तेंव्हा भिजत राहते

माणूस म्हणजे कधीच मजला कळला नाही
मनास माझ्या कोडे हल्ली छळत राहते

जखमांनाही किती वेदना होत असावी ?
थोडे थोडे दुखणे त्यांचे कळत राहते

मला हवे ते कधीच कोणा कळले नाही
नको नको ते मला सारखे मिळत राहते

नकोस येवू जवळी माझ्या,दूर निघुन जा
तिची सावली दिवसा-राती दिसत राहते

-----------------------------दर्शन शहा.

गझल: