असा कसा मोहरून गेलो....
असा कसा मोहरुन गेलो,तुला पहाता हरून गेलो
कधी न होतो जरी कुणाचा,तुझाच आता ठरून गेलो
न काहि येता कसे जगावे,इथेच सारे कळून गेले
जरी न पोहावयास येते,हरेक सागर तरून गेलो
नि:शब्द झालो सदैव तेव्हा,जशीजशी तू समोर आली
तुझेच गाणे म्हणावयाला,पुढे घसा खाकरून गेलो
समस्त दु:खे समग्र नाती,गरीब होतो धरून होतो
जसे मला धन मिळू लागले,जुने दिवस विस्मरून गेलो
न लाच घ्यावी कधी कुणीही,विचार माझा असाच होता
दिले जसे अर्थपूर्ण खाते,कित्येक टेबल चरून गेलो
जिवंत होतो कधी न तेव्हा,महत्व मी स्वच्छतेस दिधले
मरुन '' कैलास '' जीवनाचे,गटार हे आवरून गेलो
डॉ.कैलास गायकवाड
गझल:
प्रतिसाद
कैलास
रवि, 02/05/2010 - 21:07
Permalink
विश्वस्तांस विनंती : कृपया
विश्वस्तांस विनंती : कृपया खालील बदल करून गझल प्रकाशित करावी.
तिसरा शेर कृपया असा लिहावा.....
अबोल झालो तुझ्या समोरी, अताच ऊर्जा कशी मिळाली?
तुझेच गाणे म्हणावयाला,पुढे घसा खाकरून गेलो
चौथा शेर कृपया असा लिहावा....
समस्त दु:खे, समग्र नाती,गरीब होतो, धरून होतो
जसे मला लागले मिळू धन ,जुने दिवस विस्मरून गेलो
अजय अनंत जोशी
शनि, 08/05/2010 - 12:32
Permalink
कैलास, दिले जसे अर्थपूर्ण
कैलास,
दिले जसे अर्थपूर्ण खाते,कित्येक टेबल चरून गेलो
इथे 'कित्येक' च्या ऐवजी 'कितीक' करा. कदाचित काही महंतांच्या दृष्टीने हे फार महत्वाचे नसेल. पण तरी करा.
बाकी आशयाबद्दल म्हणाल तर इच्छा चांगली वाटते पण फारशी जमलीशी वाटत नाही.
शुभेच्छा!
कैलास
शनि, 08/05/2010 - 14:33
Permalink
''कित्येक '' मध्ये कि वर जोर
''कित्येक '' मध्ये कि वर जोर न देत ''कित्येक'' चा उच्चार करता येतो..... पण आपण म्हणाल्या प्रमाणे... '' कितीक'' लिहिल्यावर प्रश्नच उद्भवत नाही.....
असो..
हिरण्यकेशित एक प्रयत्न करावा...... म्हणून सुचले तसे लिहिले आहे..... पण खरेच .. मलाही जाणवत आहे की.... तितकीशी जमली नाही.
डॉ.कैलास