उदास खाली मनास घेऊन फिरतो आम्ही ...

उदास खाली मनास घेऊन फिरतो आम्ही...
माहीत नाही कोणासाठी झुरतो आम्ही...

लाट ऊसळते परीस्थितीची एकाएकी
कसेबसे मग प्राणपणाने तरतो आम्ही...

दिवस आजचा अमुच्यासाठी खोटे नाणे
रोज रुपेरी आठवणीना स्मरतो आम्ही...

साथ द्यावया कुणीच नसते असून सगळे
कधी कधी मग असे एकटे उरतो आम्ही...

कळावयाच्या आत संपते सगळे काही
सरणावरती संथ गतीने सरतो आम्ही...

अमोल शिरसाट,
अकोला.
९०४९०११२३४

गझल: 

प्रतिसाद

कळावयाच्या आत संपते सगळे काही
सरणावतती संथ गतीने सरतो आम्ही..

यात आपणास '' सरणावरती '' असे म्हणायचे असावे.

साथ द्यावया कुणीच नसते असून सगळे
कधी कधी मग असे एकटे उरतो आम्ही...

सानी मिसर्‍यात कधी कधी वापरल्याने जरा जरा गडबड झाल्याचे जाणवत आहे...

साथ द्यावया कुणीच नसते असून सगळे
सदासर्वदा असे एकटे उरतो आम्ही...... असे केल्यास?

अर्थात हे माझे मत झाले.....अंतिम निर्णय गझलकाराचा.

एकंदर छान गझल.

डॉ.कैलास

छानच आहे ....अजून येऊ देत अशा काही...

श्री. अमोल,

गझल आवडली. मुख्य म्हणजे सर्व शेरांमधील मनस्थिती समान वाटते. अभिनंदन! मतला व दुसरा शेर फारच आवडले. मला खालील दोन मते मांडायची आहेत. चु.भु.द्या. घ्या.

१. रदीफ नसती तरीही चालले असते का?

२. उदास खाली मनास घेऊन फिरतो आम्ही... - घेऊन मधला 'ऊ' र्‍हस्व हवा आहे का? (मात्रांसाठी)
माहीत नाही कोणासाठी झुरतो आम्ही... (तसेच माहीत मधील ही र्‍हस्व हवा आहे का?)

लाट ऊसळते परीस्थितीची एकाएकी (ऊसळते मधील ऊ र्‍हस्व हवा आहे का?)
कसेबसे मग प्राणपणाने तरतो आम्ही...

धन्यवाद!

उदास खाली मनास घेऊन फिरतो आम्ही...
माहीत नाही कोणासाठी झुरतो आम्ही..

या ओळीत 'खाली' रिकामा या अर्थाने योजला गेला आहे कि 'उदासख्याली' असे म्हणणे अभिप्रेत आहे?
कृपया खुलासा करावा.

साथ द्यावया कुणीच नसते असून सगळे
कधी कधी मग असे एकटे उरतो आम्ही...
फारच छान..!

अमोल,
आम्ही या रदीफने मजा येत आहे. कारण....
उदास खाली मनास घेऊन फिरतो (आम्ही...)
माहीत नाही कोणासाठी झुरतो (आम्ही...)
आम्ही नसते तर, कोण फिरतो-झुरतो? तो, मी की आम्ही? असा प्रश्नही आला असता.
आम्ही देऊन तुम्ही खुलासा केला आहेत. मी पेक्षा आम्ही बरा..:)

साथ द्यावया कुणीच नसते असून सगळे
कधी कधी मग असे एकटे उरतो आम्ही...

कळावयाच्या आत संपते सगळे काही
सरणावरती संथ गतीने सरतो आम्ही...
सुंदर!

'खाली' हा शब्द खटकतोय... 'उदासख्याली' ही सूचना चांगली आहे!

दिवस आजचा अमुच्यासाठी खोटे नाणे
रोज रुपेरी आठवणीना स्मरतो आम्ही...
मस्त ! सेम हिअर!! :)

छान आहे गझल.

उदास खाली मनास घेऊन फिरतो आम्ही...
माहीत नाही कोणासाठी झुरतो आम्ही...

लाट ऊसळते परीस्थितीची एकाएकी
कसेबसे मग प्राणपणाने तरतो आम्ही...

दिवस आजचा अमुच्यासाठी खोटे नाणे
रोज रुपेरी आठवणीना स्मरतो आम्ही...

साथ द्यावया कुणीच नसते असून सगळे
कधी कधी मग असे एकटे उरतो आम्ही...

अप्रतिम गझल....!

दिवस आजचा अमुच्यासाठी खोटे नाणे
रोज रुपेरी आठवणीना स्मरतो आम्ही...

वा! गझल चांगली झाली आहे.

वा.. रुपेरी आठवणी..उत्तम.. दर्जेदार गझल
-मानस६

खोटे नाणे खासच! छान गझल.

आपल्या सर्वांचे आभार!!!

रुपेरी आणि लाट हे शेर फार आवडले!!

छान हे विशेष करूनः

लाट ऊसळते परीस्थितीची एकाएकी
कसेबसे मग प्राणपणाने तरतो आम्ही...

दिवस आजचा अमुच्यासाठी खोटे नाणे
रोज रुपेरी आठवणीना स्मरतो आम्ही...

दिवस आजचा अमुच्यासाठी खोटे नाणे
रोज रुपेरी आठवणीना स्मरतो आम्ही...

नित्याचा अनुभव अगदी सहजपणे मांडला आहे.