करा साजरे वनवास काही ....

******************
******************

तसा ना सुखाचा त्रास काही
उसवती नवनवे भास काही

कशाला मनाचा कोंडमारा
कशाला हवे पथ्यास काही

सुखाचा असे हा मंत्र साधा
करा साजरे वनवास काही

कसा इभ्रतीचा तोल गेला
मिळाले असे फर्मास काही

जगण्या अपात्रच जे तयांच्या
तिजोरीत भरपुर खास काही

जुळावी मनें..ओठी जुळावे
मिटावे मुके संन्यास काही

मला वाटले जिंकून झाले
नजर मागते विश्वास काही

लळा लावुनी गेल्या क्षणांनो
चला आठवू प्रवास काही

इशारे नभाचे ओळखीचे
तिथे फाटके दुर्वास काही

हसावे जगाने बस हसावे
नको दान मैत्रेयास काही

*******************
*******************

गझल: 

प्रतिसाद

मतला, विश्वास, प्रवास आवडले.

धन्यवाद बेफिकीर...
इथला पहीलाच प्रतिसाद आपला मिळालाय अन तो लाखमोलाचा !!!
सस्नेह : गिरीश

सुखाचा असे हा मंत्र साधा
करा साजरे वनवास काही

चांगल्या ओळी !

मतला आणि वनवास आवडला.
'विश्वास'मधील दोन ओळींचा संदर्भ लागला नाही.

वा:! बरेचसे शेर आवडले!

जुळावी मनें..ओठी जुळावे
मिटावे मुके संन्यास काही

हा सुंदरच झालाय!

'जगण्या अपात्रच जे तयांच्या'
या ओळीत एकतर सुरुवातीचा लघु खाल्ला गेलाय, नाहीतर मधल्या गुरू ऐवजी लघु आलाय.
(इथे जरी ग च्या पुढे जोडाक्षर असले तरी त्याचा भार ग वर येऊन तो दीर्घ होणार नाही.)

तसेच,
'चला आठवू प्रवास काही' मधे प्रवास बसणार नाही, गागाल काही अशी योजना सर्व शेरात आहे.

खरं तर गझलेच्या प्रतिसादात अशी चिरफाड करणे योग्य नाही पण फक्त आपल्या निदर्शनास यावे म्हणून सांगितले.

सुखाचा असे हा मंत्र साधा
करा साजरे वनवास काही

जुळावी मनें..ओठी जुळावे
मिटावे मुके संन्यास काही

-- उत्तम शेर!वा गिरीश, ये नया नूर बहुत पसन्द आया. लिखते रहो.
जयन्ता५२

टीपः दुर्वासचा शेर मात्र कळला नाही.

सुखाचा असे हा मंत्र साधा
करा साजरे वनवास काही

वाव्वा!

अनंत-अजय-ऋत्वीक-जयंतराव आणि चित्तरंजनजी :

खुप छान वाटल सगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रीया बघुन... :-) तहे दिलसे शुक्रीया !!!
ॠत्वीक : मुक्तछंद अन गझल्'सदृश' लेखन केलेल असल तरी तंत्रान वागायचा हा माझा निव्वळ दुसरा प्रयत्न. शिकतोय धीरे धीरे :-) "प्रवास" अन दुसर्‍या शेरात डागडुजी करीन लवकरच..आपल्या मार्गदर्शनाबद्दल खुप धन्यवाद ! :-)
जोशीसाहेब : एक्सप्रेशन साधारण अस घेतलय : मला वाटल तिला जिंकुन झालय पण तिच्या नजरेतन कळतय ती अजुन आश्वस्त झालेली नाहीय ...
जयंतराव : सलाम आपको !
भटसाहेब : तुमच्या या उत्तेजनाबद्दल मनःपुर्वक आभार !!!

सस्नेह : गिरीश

फारसे प्रयत्न न घेता ही गझल भुजंगप्रयातात लयदार होईल असे वाटते. सध्याचे वृत्त कानांना खटकणारे आहे.

चित्तरंजनजी : प्रयत्न सुरुआहे. धन्यवाद !!! :-)

मला आवडलेला शेर :

हसावे जगाने बस हसावे
नको दान मैत्रेयास काही

उत्तम गझल.
राम क्रुष्ण हरी!!!