जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही !
रांगले होते
अनिल रत्नाकर | मार्च 15, 2010 - 12:21 amशिकलेल्या मेंदूला बाजारी मांडले होते
परदेशी पैशासाठी ज्ञानी भांडले होते
सुख पाण्या पोराने नातेही लांघले होते
थकलेल्या बापाने जीवाला सांडले होते
गरिबीच्या शापाने दैवाला गांजले होते
भलत्या हावेला स्वार्थाने ओलांडले होते
बघणारे वेडी स्वप्ने सारे आंधळे होते
नसत्या आशेला त्या काळाने कांडले होते
परक्या देशाच्या त्या मीठाने बांधले होते
फसव्या प्रेमाचे ते देखावे मांडले होते
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.

प्रतिसाद
नेहमीप्रमाणेच विषयांचे
नेहमीप्रमाणेच विषयांचे वैविध्य आवडले. 'होते' ही रदीफ (म्हणजे कोणतीच रदीफ) नसली तर कदाचित जास्तच सुटसुटीत वाटले असते असे माझे मत!
कांडले समजले नाही. शेवटचा शेर फार आवडला. तसेच थकलेल्या बापाचाही!
धन्यवाद!
बेफिकीरजी, मनःपुर्वक
बेफिकीरजी,
मनःपुर्वक आभार.
मलाही होते खटकत होते.पण नेहमी चुक होते म्हणून होते तसेच ठेवले होते.
पण सुचनेबद्द्ल धन्यवाद.. सुधारणा दिसेल याची खात्री.
फसव्या प्रेमाचे ते देखावे
फसव्या प्रेमाचे ते देखावे मांडले होते
ही ओळ सुंदर..!
'होते'बद्दल...
प्रत्येक ओळीतील होतेमुळे मजा हरवली आहे असे वाटते.
शिकलेल्या मेंदूला बाजारी
शिकलेल्या मेंदूला बाजारी मांडले होते
परदेशी पैशासाठी ज्ञानी भांडले होते
परक्या देशाच्या त्या मीठाने बांधले होते
फसव्या प्रेमाचे ते देखावे मांडले होते
हे दोन विशेष आवडले.
अजयजी, प्रतिसादाबद्द्ल
अजयजी,
प्रतिसादाबद्द्ल आभार.
नवे वर्ष आपल्याला गझलमय जावो.
गंगाधरजी
आपल्या प्रतिसादांनी नेहमीच बळ वाढते. धन्यवाद.
आपल्यालाही नववर्षाच्या हार्दिक शुभकामना.
एकंदर गझल चांगली
एकंदर गझल चांगली झालीये,
'होते' बाबत माझे मत अजयजींप्रमाणेच.
गरिबीच्या शापाने दैवाला गांजले होते
हे नीट कळले नाही... गरीबीचा शाप हा दैवातच असतो ना? आणि कर्मदरिद्रीपणाला शाप म्हणता येणार नाही.
धन्यवाद ऋत्विकजी. मला दैव हा
धन्यवाद ऋत्विकजी.
मला दैव हा शव्द नशिब ह्या अर्थाने वापरायचा होता. पण तुमचे म्हणणे पटले. दैवाला गांजले काही बरोबर वाटत नाही.
खुप छान. गरीबी आवडले.
खुप छान. गरीबी आवडले.
प्रतापजी, प्रोत्साहनाबद्द्ल
प्रतापजी,
प्रोत्साहनाबद्द्ल धन्यवाद.