जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या

सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?

अबोलीपरी गंध घ्यावा मिटोनी
अताशा असे वाटते मोग-यासी

न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?

उगवती नि ढळती कुठे चंद्रतारे?
उमजते न काही अता अंबरासी

जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी

गझल: 

प्रतिसाद

सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?

वा! एकंदर छान. गझल आवडली.

हाय! शामली ,
१ला आणि शेवटचा शेर आवडला.
एकूण छान.

नोंदले मी तुलाही समासी

अप्रतिम.

वा:! सुंदरच आहे गझल!
न कळते स्वत:ला असे काय होते
खुलासे कसे काय देऊ जगासी ?

हा विशेष आवडला!

रचना ओघवती आहे, चाल दिल्यावर अजून छान वाटेल!

आपल्या सर्वांच्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मंडळी

सुंदर गझल. आवडली.

मतला व खुलासे आवडले. श्यामली व कामिनी ही आपली दोन्ही नावे उत्तम आहेत, 'रिअल नेम' कोणते? (गै. न)

दोन्ही रिअलच नेम आहेत हो...अभिप्रायाबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद
(गै. क.?)

खुप छान. गंध आवडले.

छान ग़ज़ल.... मतला आणी बाकी चे शे`र ही छान... प्रतिसाद देण्यात जरा उशीर झाला. क्षमस्व.....
` ख़लिश ' - वि.घारपुरे / २३-०३-२०१०.

सुचावे न काही रुचावे मनासी
अशी हाय कोठून येते उदासी?

अप्रतिम रचना!!!

पुन्हा एकदा धन्यवाद मंडळी

छान.........
जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी

गझल आवडली. शुभेच्छा...

चांगली गझल आहे.

खुप छान आहे गझल मनाला भावली.

अप्रतिम गझल

जशा कैक होत्या व्यथा गोंदलेल्या
तसे नोंदले मी तुलाही समासी
खुपच सुरेख .......

पुन्हा वाचली... आता मात्र मतलाच आवडला. पण तो खूप सहज आला आहे. हे ही आहे. :)

गझल छान झाली आहे!
अभिनंदन