इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
हात माझे फुलांनी ही पोळले होते.....
खलिश | मार्च 10, 2010 - 11:33 pmहात माझे फुलांनी ही पोळले होते
पावसाचे फुवारे ही बोचले होते.....
रेशमी बंधने ही फासा परी झाली
केवड्याला भुजंगानी वेढले होते....
रोज़ मी वाट त्याची पाहू किती आता ?
मी च स्वप्ना मधे त्याला चोरले होते.....
दुखः का एवढे भारी वाटते आता ?
केशराच्या परागानी तोलले होते.....
घेत आहे मद्यपींची काळजी आता
कंठ ज्यांचे दुधाने ही पोळले होते.....
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / १०-०३-२०१०.
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.

प्रतिसाद
शेवटचा शेर छान. घेत आहे
शेवटचा शेर छान.
घेत आहे मद्यपींची काळजी आता = तसं सरकारही घेतच आहे..:)
कंठ ज्यांचे दुधाने ही पोळले होते..... = तसं हल्ली सगळीकडेच भेसळ आहे म्हणा....:)
छान शेर.
वा: परत इथे देत बसत
वा:
परत इथे देत बसत नाही..
एवढंच सांगतो...
सगळेच शेर आवडले!
रोज़ मी वाट त्याची पाहू किती
रोज़ मी वाट त्याची पाहू किती आता ?
मी च स्वप्ना मधे त्याला चोरले होते....
हा जास्त आवडला.
सर्वश्री अजय, ऋत्विक आणी
सर्वश्री अजय, ऋत्विक आणी गंगाधरजी ह्यांस,
सप्रेम नमस्कार आणी प्रोत्साहना बद्दल धन्यवाद.
लोभ असावा.
` ख़लिश ' / वि. घारपुरे. १२-०३-२०१०.
खुप छान. केवडा आवडले.
खुप छान. केवडा आवडले.