काही वेळा.....

काही वेळा कोणीही नसणे
काही वेळा कोणीही असणे

शाळेची मधली सुट्टी..... जीवन
डबा खायला कोठेही बसणे

संसाराचे हैंडल एक धरे
अन दुसऱ्याने पैंडल हापसणे

बोलण्यासही वेळ नसे... त्यांच्या
आनंदासाठी कंबर कसणे

एक जुनाबाजार मनांचा हा
भाव कमी... वापरलेली असणे

मुद्देसुद चर्चा म्हणजे केवळ
एकाने दुसऱ्यावरती ठसणे

वैवाहिक आयुष्य असावे हे
रोजरोजचे दोघांनी फसणे

प्रतिसाद

आपणांस सहज सुचल्याचे

आपणांस सहज सुचल्याचे जाणवते.

डॉ.कैलास

एक जुनाबाजार मनांचा हा ही ओळ

एक जुनाबाजार मनांचा हा
ही ओळ छान.
भाव कमी... वापरलेली असणे
म्हणजे काय? कोण वापरलेली असणे?

शाळा वाचुन काही जणांची आठवण झाली.....आणि हसू आले हे सांगणे न लगे....:)

मुद्देसुद चर्चा म्हणजे

मुद्देसुद चर्चा म्हणजे केवळ
एकाने दुसऱ्यावरती ठसणे
खास आवडला.

एक जुनाबाजार मनांचा हा भाव

एक जुनाबाजार मनांचा हा
भाव कमी... वापरलेली असणे

मुद्देसुद चर्चा म्हणजे केवळ
एकाने दुसऱ्यावरती ठसणे

वैवाहिक आयुष्य असावे हे
रोजरोजचे दोघांनी फसणे
हे चांगले आहेत.

मुद्देसूद चर्चा.....मस्तच !!

मुद्देसूद चर्चा.....मस्तच !!

खुप छान. मधली सुट्टी आवडले.

खुप छान. मधली सुट्टी आवडले.