पेटतो सोहळा...

पेटतो सोहळा आता कुठे ?
जागतो 'मी' तसा आता कुठे ?

का मनीं दाटल्या सार्‍या व्यथा ?
[बोलतो चेहरा आता कुठे..?]

जन्म झाला ! मिळाला चेहरा..!
हा हवा, तो हवा.. आता कुठे ?

भीक मागायला लोंढे किती..
एकही चोर ना आता कुठे..!

आस नाही तुला भेटायची
राहतो मोकळा आता कुठे..?

ज्येष्ठता वाढली सगळीकडे...
श्रेष्ठ ना राहिला आता कुठे..!

गझल: 

प्रतिसाद

खुप छान. चेहरा आवडले.

जन्म झाला ! मिळाला चेहरा..!
हा हवा, तो हवा.. आता कुठे ?

प्लास्टिक सर्जरी करा की राव !!.....
विनोद वगळता......छान गझल अजयसाहेब.....

कैलास

मस्तच !!
चेहरा, चोर, मक्ता.... आवडेश :)

ज्येष्ठता वाढली सगळीकडे...
श्रेष्ठ ना राहिला आता कुठे..!

जास्त आवडले.

प्रताप, कैलास, जयश्री, गंगाधर सर्वांचे आभार!
६ पैकी ३ आवडले म्हणजे बरी जमली म्हणायची..!!:)

जन्म झाला ! मिळाला चेहरा..!
हा हवा, तो हवा.. आता कुठे ?

खुपच छान!