वारुळे

वारुळे निराशांचीच फोडतो मी
देवळे दिलाशांचीच जोडतो मी

बाटले कसे संस्कार खानदानी
पावले विनाशांचीच खोडतो मी

रोज नाचलो गुर्मीत जीवघेण्या
वाट त्या तमाशांचीच सोडतो मी

धावलो जरा वेगेच मी जगाया
दाट लाट श्वासांचीच जोडतो मी

सोडले मला अर्ध्यात आज ज्यांनी
साथ त्या हताशांचीच तोडतो मी

नेहमीच ते सामील कौरवांना
जात पात फाशांचीच मोडतो मी

खेळ आज नात्यांनीच मांडले हे
गाठ त्याच पाशांचीच सोडतो मी

गझल: 

प्रतिसाद

खुप छान. वारुळ, देवळे आवडले.

छान गझल. आवडली. विचारांमधे खूपच वेगळेपण जाणवले.

गझल खरंच छान झालीये. तुमच्या भावनांना, विचारांना शब्द आणि तंत्राची योग्य जोड मिळाली आहे.
नेहमीच ते सामील कौरवांना
जात पात फाशांचीच मोडतो मी

वा:!

प्रतापजी, धन्यवाद.
बेफिकीरजी, आपल्या प्रतिसादातील आपले असे वेगळेपणच भावते.
ऋत्विक्जी, धन्यवाद. अखेर गझलेचे फाटक माझ्यासाठी ऊघडलेत, आभारी आहे.
लोभ असावा.

छान गझल. आवडली.

वा! वा!! गझल आवडली.
सोडले मला अर्ध्यात आज ज्यांनी .... छान ओळ.