कसे सांगायचे

ईमले स्वप्नातले 'नावे' कसे मांडायचे
वागण्याचे ते खरे 'कावे' कसे सांगायचे

रिक्त होते मापटे ते वेस ओलांडायचे
प्रश्न होता मी तिला 'यावे' कसे सांगायचे

जीवघेणे नेत्र चाळे ते कसे टाळायचे
संभ्रमांना आज या 'दावे' कसे बांधायचे

मोह झाला खूप आता, मार्ग ना परतायचे
क्लीष्ट सारे ते जसे 'भावे' तसे सांधायचे

सात जन्माचे तिचे नाते कसे खोडायचे
डाव तो जो मांडला 'भावे' तसे नांदायचे

बास झाले खेळ तूझे, एकटे मज राहु दे
प्रश्न होता मी तिला 'जावे' कसे सांगायचे

गझल: 

प्रतिसाद

ईमले स्वप्नातले 'नावे' कसे मांडायचे
वागण्याचे ते खरे 'कावे' कसे सांगायचे

रिक्त होते मापटे ते वेस ओलांडायचे
प्रश्न होता मी तिला 'यावे' कसे सांगायचे

जीवघेणे नेत्र चाळे ते कसे टाळायचे
संभ्रमांना आज या 'दावे' कसे बांधायचे

मोह झाला खूप आता, मार्ग ना परतायचे
क्लीष्ट सारे जे मना 'भावे' तसे सांधायचे

सात जन्माचे तिचे नाते कसे खोडायचे
भूतकाळानेच थबकावे' तसे थांबायचे

बास झाले खेळ तूझे, एकटे मज राहु दे
प्रश्न होता मी तिला 'जावे' कसे सांगायचे

वागण्याचे ते खरे 'कावे' कसे सांगायचे

प्रश्न होता मी तिला 'यावे' कसे सांगायचे

संभ्रमांना आज या 'दावे' कसे बांधायचे
या ओळी आवडल्या.

बास झाले खेळ तूझे, एकटे मज राहु दे
प्रश्न होता मी तिला 'जावे' कसे सांगायचे
ही द्विपदी आवडली.

बाकी,
आपल्या गझलेतील इतर गोष्टीसाठी (सुधारणा) माझ्या 'जात आहे मार्ग टाळूनी तुला' यावर वैभव जोशींनी दिलेला प्रतिसाद अवश्य पहा.

धन्यवाद,
आपल्या मार्गदर्शनाने उत्साह येतो.
प्रयत्नपुर्वक केलेल्या गझलमध्ये चूक झाली की अस्वस्थ व्हायला होते.
एक नक्की, यापुढे एकदम बिनचूक गझल लिहिण्याचा प्रयत्न असेल.

रिक्त होते मापटे ते वेस ओलांडायचे
प्रश्न होता मी तिला 'यावे' कसे सांगायचे

ही द्विपदी आवडली.

खुप चांगली आहे. सात जल्माचे नाते आवडले.

रिक्त होते मापटे ते वेस ओलांडायचे
प्रश्न होता मी तिला 'यावे' कसे सांगायचे

सुंदर!

ऋत्विकजी,
प्रतापजी,
बेफिकीरजी
धन्यवाद.

रिक्त होते मापटे ते वेस ओलांडायचे
प्रश्न होता मी तिला 'यावे' कसे सांगायचे

बास झाले खेळ तूझे, एकटे मज राहु दे
प्रश्न होता मी तिला 'जावे' कसे सांगायचे
आवडले.

गंगाधर मुटे
मनःपुर्वक आभार.