ना मिळे

ना मिळे ती भाकरीही बघाया
रोज धोंड्याची उशी ती निजाया

नित्य वाया अक्षतांचा ढिगारा
तांदळाची पेज, तीही, न प्याया

वाळलेल्या रोपट्यांचा नजारा
लागली ती जंगलेही रडाया

कर्जफेडाया जगावे कशाला
कोणताही मार्ग नाही सुटाया

ह्या मढ्यांचा रोज वाढे पसारा
शेत जाळे, आस नाही जगाया

जन्म ना तो लाभतो मानवाचा
देव झाली माणसे, ती तराया

गझल: 

प्रतिसाद

३ व ४ आवडले.

धन्यवाद.

माझे नाव जे इंग्रजीत येते ते मरठीत कसे करता येईल याबद्दल आपणास काही माहीती असल्यास देता येइल का?
मला ते फार खटकते. तसदीबद्दल क्षमस्व.

नित्य वाया अक्षतांचा ढिगारा
तांदळाची पेज, तीही, न प्याया
हा शेर छान.
परंतु, यात अक्षता या शब्दाला अनुसरून आणखी एखादा उल्लेख आला असता तर आणखी छान झाले असते.
छान.

धन्यवाद.
लग्न-कार्यात तांदुळ पायदळी तुडवला जातो त्याने मन विषण्ण होते, तसेच काही नवरदेव फुलांच्या पायघड्यांवरुन बुट घालून चालतात, असे वाटते ह्या पाकळ्यांचे काटे व्हावेत. आपली सुचना खरेच मान्य आहे पण मनातले विषय मला कवितेत मांडणे जेव्हढे जमते तेव्हढे अद्याप गझलेत जमत नाही. काही तांत्रिक चूका होतातच.
कळावे.
काही अवास्तव वाटल्यास क्षमस्व.

ही माझी वैयक्तिक मते आहेत. कोणाला दुखावणे हा हेतु नाही.