ना कळे

मोडले नाते कधी ते बालकाला ना कळे
वाट पाहाते डहाळी पाखराला ना कळे

तोडता फांदी, घळाळा ढाळते अश्रूच ती
लाघवी ते वागणे, का? घात झाला ना कळे

ओतले आयुष्य त्यांनी हेच नाही जाणले
तोडले देठास कोणी, का, कशाला? ना कळे

मंगलाचा शोध घेती आज प्राणी पाखरे
आसरा आहे घरी हे, त्या क्षणाला ना कळे

आंधळा झालाच तो, कावाच हा ना ओळखे
प्रेम आहे की लबाडी, हेच आता ना कळे

आपले ते आपले कळले मुलाला आज आहे
सर्व ते स्वार्थीच होते आज त्याला आकळे

गझल: 

प्रतिसाद

दुसरा, तिसरा व चवथा शेर फार आवडले. पाचव्या शेरात काफिया व सहाव्या शेरात रदीफ बदलली असावी असे वाटते.

धन्यवाद
आपल्या मार्गदर्शनाने मी सुधारणा करीन हे निश्चित.

बेफिकीरशी सहमत. पहिल्या शेरातील 'पाहाते' खटकले.

धन्यवाद
प्रेम आहे की लबाडी, हेच आता ना कळे
च्या ऐवजी
प्रेम आहे की लबाडी, हे कुणाला ना कळे
आणि
सर्व ते स्वार्थीच होते आज त्याला आकळे
च्या ऐवजी
सर्व का स्वार्थीच होते आज त्याला ना कळे
हे योग्य वाटते का?

अजयजी,
वाट पाहाते डहाळी पाखराला ना कळे
पाहाते ऐवजी
साद घाले ती डहाळी पाखराला ना कळे
योग्य वाटते का?
धन्यवाद

अनिलजी,
सर्व ते स्वार्थीच होते आज त्याला आकळे
याऐवजी
सर्व का स्वार्थीच होते आज त्याला ना कळे
हे कसं काय असू शकतं?
निदान ओळीचा अर्थ तसाच राहील असं पहा.

साद घाले ती डहाळी पाखराला ना कळे
पाहाते हे तंत्रदृष्ट्या म्हटले. ही ओळ तंत्रदृष्ट्या योग्य.

ऋत्विकजी,
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
आपल्या सुच्नेप्रमाणे बदल केला आहे.
असाच लोभ असावा.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.

अजयजी,
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.
असाच संवाद असावा, यातुनच शिकायला मिळ्ते.
धन्यवाद.