गझल तिहाई मुशायर यू ट्यूब वर व पुढील मुशायरे

गझल तिहाई मधील मुशायरा यू ट्यूब वर 'गझल तिहाई' असे शोधून मिळेल. प्रत्येक गझलेचा एक व्हिडिओ केलेला आहे.

यानंतर असे आणखीन मुशायरे करण्याचा विचार आहे. साधारण दर दोन महिन्यात एक होईल. चार सदस्य कायमस्वरुपी व चार सदस्य बदलत राहतील. अशा मुशायर्‍यांचे स्वरूप अत्यंत रसिक फ्रेंडली असे असेल, ज्यात कोणतीही भाषणे नसतील.

शक्य झाल्यास मुशायर्‍यातील निदान एक फेरी तरी एका विशिष्ट विषयावरील गझलांची असेल.

एकंदर चक्री पद्धतीने किमान पाच व जास्तीतजास्त सात फेर्‍या होतील.

इंटरेस्ट असल्यास कृपया या निवेदनाचा प्रतिसाद म्हणून कळवावे.

मुशायरे अर्थातच पुण्यात व रविवारी सायंकाळी होतील. या मुशायर्‍यांचे वर्तमानपत्रांमधे निवेदन दिले जाईल. तसेच, बातमीसाठी दरवेळेस योग्य ते प्रयत्न करण्यात येतील.

चार कायमस्वरुपी सदस्य स्वखर्चाने मुशायरा करण्यात असल्याने इतर सदस्यांना मानधन देणे शक्य नाही. मात्र, गझल-मित्र म्हणून त्यांच्या सहभागाची अपेक्षा आहे. एकंदर सदस्य आठपेक्षा कमी झाल्यास किंवा फक्त चारच असल्यासही मुशायरा होईलच!

उद्दिष्ट फक्त गझलचे रसिक वाढवणे एवढेच!

आगामी कार्यक्रम: 

प्रतिसाद

यु ट्यूब वरच्या व्हिडिओ मधे आवाज येत नाहीये

यु ट्युब व्हिडीयो मधे आवाज जरा कमी आहे.

मला मुशायरां मधे इन्टरेस्ट आहे.