सडे मुरवुनी

सडे मुरवुनी आसवांचे, जमीनीतुनी वांझ बीजे खुडू लागले
निघाले जसे गाव शहराकडे, शेत ओसाड सारे रडू लागले

सुखातून दुःखे अशी भेटली की गतीरोधकाहून खड्डे बरे
मिळाली जरी एक आरामगाडी, प्रवासामधे भडभडू लागले

असे पाहिजे नी तसे पाहिजे यात आयुष्य हातातुनी चालले
घडू लागले ते बरे मानल्यावर जसे पाहिजे ते घडू लागले

रिकामाच होतो, सहज काढला आवरायास माळा मनाचा जरा
क्षणार्धात कुलुपे पुन्हा लावली मी, नको ते तिथे सापडू लागले

युगे जाहली पण तुझी पावले आज दारात माझ्या थबकली पहा
कुठे सोडला धीर या चेहऱ्याने, हृदय फक्त हे धडधडू लागले

तसे प्रेम एकाचवेळी उमलले, सरकले पुढे आपले आपले
मला लागली आवडायास ती अन तिलाही कुणी आवडू लागले

असावे इथे औषधाच्याचपुरते असा काढला आज निष्कर्ष मी
सदा या जगाला कडू लागलो मी, सदा जग मला हे कडू लागले

गझल: 

प्रतिसाद

रिकामाच होतो, सहज काढला आवरायास माळा मनाचा जरा
क्षणार्धात कुलुपे पुन्हा लावली मी, नको ते तिथे सापडू लागले

क्या बात है!!!!

डॉ.कैलास

खुप आवडली. ओसाड शेत, औषध आवडले.

सुखातून दुःखे अशी भेटली की गतीरोधकाहून खड्डे बरे
ही ओळ छान.

असे पाहिजे नी तसे पाहिजे यात आयुष्य हातातुनी चालले
घडू लागले ते बरे मानल्यावर जसे पाहिजे ते घडू लागले

युगे जाहली पण तुझी पावले आज दारात माझ्या थबकली पहा
कुठे सोडला धीर या चेहऱ्याने, हृदय फक्त हे धडधडू लागले

तसे प्रेम एकाचवेळी उमलले, सरकले पुढे आपले आपले
मला लागली आवडायास ती अन तिलाही कुणी आवडू लागले

असावे इथे औषधाच्याचपुरते असा काढला आज निष्कर्ष मी
सदा या जगाला कडू लागलो मी, सदा जग मला हे कडू लागले
हे शेर सुंदर..

रिकामाच होतो, सहज काढला आवरायास माळा मनाचा जरा
क्षणार्धात कुलुपे पुन्हा लावली मी, नको ते तिथे सापडू लागले
हा शेर लाजवाब..!

[नजरेतून ही गझल सुटली होती. क्षमस्व. सहज शोधताना सापडली.]

क्षमस्व कसले? लक्षात आल्यावर प्रतिसाद दिलात यासाठी आभार! (मी ही गझल रचली याचे मलाच आता नवल वाटत आहे... कारण मला स्वतःलाच ती बर्‍यापैकी आवडली बर्‍याच दिवसांनी वाचून... उदाहरणार्थ खालील शेर! हा हा हा!)

असे पाहिजे नी तसे पाहिजे यात आयुष्य हातातुनी चालले
घडू लागले ते बरे मानल्यावर जसे पाहिजे ते घडू लागले

सर्वांचे आभार!

निघाले जसे गाव शहराकडे, शेत ओसाड सारे रडू लागले

वास्तव,
अप्रतिम गझल.

सडे मुरवुनी आसवांचे, जमीनीतुनी वांझ बीजे खुडू लागले
निघाले जसे गाव शहराकडे, शेत ओसाड सारे रडू लागले

वा! व्वा!!
बाकी गझल आवडली.

आवडली गझल...

असे पाहिजे नी तसे पाहिजे यात आयुष्य हातातुनी चालले
घडू लागले ते बरे मानल्यावर जसे पाहिजे ते घडू लागले

हा शेर चांगला आहे. विशेषतः खालची ओळ.

सुटे मिसरेही उत्तम आहेत. फार आवडले.उदाहरणार्थ:

मला लागली आवडायास ती अन तिलाही कुणी आवडू लागले

सदा या जगाला कडू लागलो मी, सदा जग मला हे कडू लागले

(वरच्या ओळीत औषधाऐवजी उपचार यायला हवे होते असे वाटून गेले)

एकंदर गझल चांगली झाली आहे.

अनिल, गंगाधर, आनंदयात्री व चित्तरंजन!

मनापासून आभार!

वावा !
३,४,६ हे शेर सुरेख आले आहेत.

सातवा शेर सर्वोत्तम वाटला. विशेषतः दुसरी ओळ- प्रभावी कल्पना आहे !
ही गजल सुटली होती खरंच, माझ्याही वाचनातून !