शोध ज्याचा घेतला तो..(अनुवाद) : केदार पाटणकर

खूप दिवसांपासून एखाद्या उर्दू गझलेचा अनुवाद करावा, असे घोळत होते. 'हवी तशी' गझल मिळत नव्हती. 'जुस्तजू...' बाबत तो योग जुळून आला. आतापर्यंत इंग्रजीतून मराठीत गद्याचे अनुवाद केले आहेत. उर्दूतून मराठी हा पहिलाच प्रयत्न आहे. आनंद, अस्वस्थता, समाधान....अनुवाद करताना निर्माण झालेल्या या सुपरिचित भावनांचे संमेलन अजूनही मनात आहे. उत्तमतेला नेहमीच वाव असतो, या नम्र जाणिवेसह मूळ गझल व अनुवाद सादर करीत आहे.

जुस्तजू जिसकी थी उस को तो न पाया हमने
इस बहाने से मगर देख ली दुनिया हमने
शोध ज्याचा घेतला मी, भेटला नाहीच तो तर
या निमित्ताने, चला, ही बघितली दुनिया कलंदर

तुझको रुसवा न किया खुद भी पशेमाँ न हुये
इश्क़ की रस्म को इस तरह निभाया हमने
भेटलो नाही तुला मी, दूर आपणहून गेलो
रीत प्रीतीची तशी मी पाळली होती बरोबर

कब मिली थी, कहाँ बिछड़ी थी, हमें याद नहीं,.
ज़िन्दगी तुझको तो बस ख़्वाब में देखा हमने,
सोबतीने राहिलो नाही कधी दोघे पुरेसे....
पाहिले केवळ तुला स्वप्नात आयुष्या खरोखर

ऐ 'आद' और सुनाये भी तो क्या हाल अपना
उम्र का लम्बा सफ़र तय किया तनहा हमने ...
काय आता ऐकवावे? काय सांगावे कुणाला?
एकट्याने वाट माझी चाललो आहे निरं
तर..

गझल: 

प्रतिसाद

ज्ञानेश,
मध्यंतरी विदागारास झालेल्या अपघातामुळे काही प्रतिसाद गेले.
कब मिली थी..या शेराचा तू केलेला अनुवाद योग्य असून तो कृपया पुन्हा प्रतिसादस्वरुपात दे.

छान अनुवाद केदार. मधे एकदा हा अनुवाद वाचला होता. आज पुन्हा वाचला.

अनुवाद करणे खरे तर खूप कठीण असते. पण आपण चांगलाच अनुवाद केलात. मला वाटते अशा अनुवादांचे सगळ्यांनी मिळून एक पुस्तक काढायला हवे. एकेकाने एकेक अनुवाद करायचा.

एक गोष्ट लक्षात आली नाही. आपण असे म्हंटले आहेत.

'हवी तशी' गझल मिळत नव्हती

म्हणजे काय? मराठी संस्कृतीच्या दृष्टीने की अनुवादाच्या सुलभतेच्या?

अर्थातच गद्याचा अन पद्याचा अनुवाद यात प्रचंड फरक आहे.

पद्याचा अनुवाद करताना परभाषिक संस्कृती, विचार व वातावरण यांना पद्यतंत्रात बसवणे ही जिकिरीची बाब आहे.

धन्यवाद!

'हवी तशी' म्हणजे अनुवादसुलभतेच्या दृष्टीने.

केदार अनुवाद आवडला.. चांगला प्रयत्न आहे...

विरंगुळा म्हणून अनुवाद करीत राहावे.