बसल्य बसल्या

रचतो गझला, मी फक्त, बसल्या बसल्या
होतो अपुला, मी मुक्त, बसल्या बसल्या

हसणे, रुसणे, ते घोळ करणे, नटणे
सहजी मिळतो, आसक्त, बसल्या बसल्या

बसलो आहे, मी गप्प बसलो आहे
उसळी मारे, हे रक्त बसल्या बसल्या

कुठली का ती, मैफील असुदे, तेथे
ठरलो अगदी, संयुक्त, बसल्या बसल्या

पुजतो अपुली, मूर्तीच 'बेफिकीर' मी
बनतो अपुला, मी भक्त बसल्या बसल्या

१. सूट - मतल्यात व 'संयुक्त' या शेरांमधे अलामत!

२. लय - प्रत्येक ओळीत, मतल्यातील 'बसल्या बसल्या' च्या ईक्विव्हॅलन्ट शब्दसमूह यतीनंतर उच्चारावेत. (खास जळगावकरांसाठी)

गझल: 

प्रतिसाद

बसलो आहे, मी गप्प बसलो आहे
उसळी मारे, हे रक्त बसल्या बसल्या

आवडल्या ओळी.

शिकतो गझल, मी फक्त वाचता,वाचता
लिहू का हजल, मी मुक्त, हसता हसता.

जमल्या का ओळी ?

-दिलीप बिरुटे
[शिकाऊ गझल लेखक]

'निदान या स्थळावर' आपली ही नवीन बिरुदावली जास्त संयुक्तिक आहे. आपण मुळातच स्वतःला एका 'आगामी' परंतु 'आता स्वेच्छेने प्रकाशित न केल्या जाणार असलेल्या' हझलेपासून वाचवले आहेत याबद्दल अभिनंदन! आपल्याला ज्या ओळी सुचलेल्या आहेत त्यांच्यातील काव्य 'उंचीवरचे' असले तरी तंत्र बुटके आहे . त्या ओळी वृत्तात नाहीत.

बोलत राहू, भेटत राहू!

मनापासून धन्यवाद!

>>>आपल्याला ज्या ओळी सुचलेल्या आहेत त्यांच्यातील काव्य 'उंचीवरचे' असले....
कौतुकाबद्दल धन्यवाद. :)

>>तरी तंत्र बुटके आहे . त्या ओळी वृत्तात नाहीत.
हम्म !!! हे वृत्त काय असते ? आणि ’बुटके तंत्र’ म्हणजे काय ?

>>बोलत राहू, भेटत राहू!
हा हा हा आमचेच शब्दांचे पुष्प आम्हालाच.
हे बात कुछ हजम नही हूई.

-दिलीप बिरुटे
[शिकाऊ गझल लेखक]

धन्यवाद

लय छान आहे.