यातूनच माझे दैव सदा घडलेले

यातूनच माझे दैव सदा घडलेले
जे रस्त्यावरती ओवाळुन पडलेले

सुखशय्येची का नीज मला भावेना?
हे कुठल्या वेश्येवरती मन जडलेले?

ही आयुष्याची गाडी लागत आहे
या वासाने अस्तित्वच भडभडलेले

ही पिढ्यापिढ्यांची कमाल आहे मित्रा
की रडणार्‍यांना सावरती रडलेले

तू पूर्णपणे गेलास विसरुनी की मग
मिळते तेव्हा... केव्हाचे आवडलेले

का दगडांवरती भक्ती करता यारो?
फोडूनही बघा? कोण तिथे दडलेले!

तुमची तर पूजा अजून चालू आहे
गेले ते ढग, जे होते गडगडलेले

तू भेटतेस गर्दीमध्ये हल्लीही
पण पुन्हा न मिळते .. तेव्हा सापडलेले

ते परके होते, हात मला देणारे
ते माझे होते, जे होते नडलेले

एकाच ठिकाणी भेट आपली होते
हे नशीब असते जेव्हा आखडलेले

कोणीच शेवटी झाले नाही अपुले
'बेफिकीर' आहे प्रेत तुझे सडलेले

गझल: 

प्रतिसाद

तू भेटतेस गर्दीमध्ये हल्लीही
पण पुन्हा न मिळते .. तेव्हा सापडलेले

एकाच ठिकाणी भेट आपली होते
हे नशीब असते जेव्हा आखडलेले

कोणीच शेवटी झाले नाही अपुले
'बेफिकीर' आहे प्रेत तुझे सडलेले

खुपच सुन्दर

ही आयुष्याची गाडी लागत आहे
या वासाने अस्तित्वच भडभडलेले

तू भेटतेस गर्दीमध्ये हल्लीही
पण पुन्हा न मिळते .. तेव्हा सापडलेले

कोणीच शेवटी झाले नाही अपुले
'बेफिकीर' आहे प्रेत तुझे सडलेले
अप्रतिम! या ठिकाणी 'बेफिकीर' हा शब्द अगदी चपखल बसलाय!

का दगडांवरती भक्ती करता यारो?
फोडूनही बघा? कोण तिथे दडलेले!

या 'फोडूनही बघा' मधे जरा अडखळायला होतंय.

योग, ऋत्विक

आभार!

या 'फोडूनही बघा' मधे जरा अडखळायला होतंय.

मताचा आदर, खरे तर पुन्हा म्हणून पाहिले, गडबड न जाणवल्यामुळे तसेच ठेवले.

स्पष्टपणाबद्दल विशेष आभार!

सुखशय्येची का नीज मला भावेना?
हे कुठल्या वेश्येवरती मन जडलेले?

या वासाने अस्तित्वच भडभडलेले

का दगडांवरती भक्ती करता यारो?
फोडूनही बघा? कोण तिथे दडलेले!

'बेफिकीर' आहे प्रेत तुझे सडलेले

असे काहितरी लिहिल्यने चान्ग्ले नाही झाले.