----पुन्हा का----

फुका का हसावे उगा का हसावे
असे हे हसू पुन्हा का हसावे ..

जमिनीत रोवून आभाळात जावे
पाण्यात न्हावुन पुन्हा का रुसावे

चिखलात कमळ फुलवित आहे
आपलीच भ्रांत पुन्हा का पुसावे

कोकिळिचा आवाज दूर गात जावे
कावळ्याला त्या पुन्हा का कुसावे

चोरीच्या जाळ्यात चोरानेच जावे
आपुलेच ठसे पुन्हा का ठसावे

संत्रिच्या बागात लिंबाने यावे
आंबट स्वाद पुन्हा का फसावे

प्रेमाच्या साक्षीने आनंदित व्हावे
असा हा आनंद पुन्हा का नसावे

----नेहा पांडुरंग परी ----

गझल: 

प्रतिसाद

नेहा,
आपण गझलेच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करता हे चांगलंच आहे,
पण तसे करताना गझलेचं तंत्र व त्यातील गमक समजून घेतले पाहिजे.
ही गझल आणि आपली आधीची 'नसते आशा जीवनाची' ही गझल; दोन्ही वाचताना असं जाणवलं की तुम्हाला खूप काही सांगायचंय पण ते साच्यात बसवताना गडबड होतेय.

आपल्या पुढील रचनांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

जमिनीत रोवून आभाळात जावे
पाण्यात न्हावुन पुन्हा का रुसावे

नेहा,
आपण गझलेच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करता हे चांगलंच आहे,
पण तसे करताना गझलेचं तंत्र व त्यातील गमक समजून घेतले पाहिजे.
ही गझल आणि आपली आधीची 'नसते आशा जीवनाची' ही गझल; दोन्ही वाचताना असं जाणवलं की तुम्हाला खूप काही सांगायचंय पण ते साच्यात बसवताना गडबड होतेय.

आपल्या पुढील रचनांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'त्यातील गमक' म्हणजे काय?

-बेफिकीर

'गझलेतील सर्व ओळी एकाच वृत्तात असायला हव्यात' असा कायदा बाराखडीमधे आहे.

हा मूलभूत नियम डावलून ही गझल झाली आहे असे वाटते.

-बेफिकीर!