भेटलेली माणसे घनदाट होती !
थेट पोचायास कोठे वाट होती ?
मदार
पुलस्ति [19 ऑक्टोबर 2009]
काय होता निरोप वार्यावर?
पान हलते अजून झाडावर...
शब्द साधा किती खुलून दिसे
अर्थ थोडा वयात आल्यावर
पाखरांचा बघा रुबाब जरा
नभ जणू तोलतात पंखावर!
का तुलाही निघून यावेसे -
वाटते; देवळात गेल्यावर?
हात अश्रूंत चिंब भिजले जे
या जगाची मदार त्यांच्यावर
(अन्यत्र प्रकाशीत)
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
प्रतिसाद
अर्थ थोडा वयात आल्यावर
-- मतला व हा शेर आवडला. पण पुलस्तिजी , ही गझल तुमच्या इतर गझलांइतकी घट्ट बांधणीची झाली नाही असे वाटत राहते.क्षमस्व.
जयन्ता५२
पुलस्तीसाहेब,
अर्थ व शेवटचा शेर फार आवडले. पंखावर पण सुंदर शेर आहे. एक शंका आहे. कृपया आपले मत समजावे.
देवळाच्या शेराचा अर्थ व त्या शेरात 'तुला' या शब्दाचे प्रयोजन मला लक्षात आले नाही.
क्षमस्व!
गझल आली बरेच दिवसांनी
छान प्रत्येक शेर शेरावर
-बेफिकीर!
काय होता निरोप वार्यावर?
पान हलते अजून झाडावर...
वाव्वा!
शब्द साधा किती खुलून दिसे
अर्थ थोडा वयात आल्यावर
वाव्वा!
पाखरांचा बघा रुबाब जरा
नभ जणू तोलतात पंखावर!
वाव्वा!
पहिले तिन्ही शेर मस्त. अतिशय आवडले. चौथा विशेष कळला नाही.
पहिले तीनही शेर खरंच अतिशय सुरेख!
शब्द साधा किती खुलून दिसे
अर्थ थोडा वयात आल्यावर
क्या बात है !!!! क्या बात है !!! क्या बात है !!!!!
अप्रतिम शेर. फारच सुंदर.
आपला,
(रत्नपारखी) धोंडोपंत
छान गझल. पहिले दोन शेर मला अधिक आवडले.
देवळाचा शेर तेवढा स्पष्ट वाटला नाही.
सोनाली
देवळाचा शेर बदलून -
टाळतो देवळात जाणे मी...
(ताण येतो उगाच आत्म्यावर)
प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार!
व्वा! ताण येतो उगाच आत्म्यावर!
सुंदर शेर! फार सुरेख!