येथे राज्य चालते माझे

स्वस्त बिडीचे थोटुकसुद्धा फेकुन देण्याइतका
नसेल पैसा एक दिवस देशीही घेण्याइतका

उपभोगांची कमाल मर्यादा नोंदवली... आता
निलाजरा झालो आहे खजुराहो लेण्याइतका

धुंदीमध्ये आठवणींची हकालपट्टी केली
हवा द्यायला मान तुझ्या विरहाला मेण्याइतका

पृथ्वी आहे देवा, येथे राज्य चालते माझे
स्वर्ग तुझा आहेच कुठे मी जिवंत येण्याइतका?

'बेफिकीर'ची जन्म घ्यायची जरी पात्रता आहे
बहुधा तो मुरला नाही मृत्यूने नेण्याइतका

गझल: