साभार परत..

आज पुन्हा तीच रात आठवली होती,
साभार तू परत स्वप्ने पाठवली होती....

कोसळल्या अवचित उल्का धडकल्या उरात,
कल्लोळ उसळला जेव्हा ती खूण समजली होती....

क्षणात गुलाबी जगती अंधार काळा दाटला,
ज्याच्यात रहस्ये सारी मी खोल दडवली होती....

दिसून आले खरे चेहरे मुखवट्यांचे,
रूपे आपापली जी मुद्दाम लपवली होती....

पूस मना पूस डोळे पून्हा झिरपण्यासाठी,
सावर तू आभाळ ज्यातूनि वीज उसवली होती....

गझल: 

प्रतिसाद

पूस मना पूस डोळे पुन्हा झिरपण्यासाठी

मला या रचनेचा आशय फार आवडला. तरी, 'मुखवटे' वगैरे प्रकारचे शेर खूप वेळा येऊन गेलेले असल्यामुळे जरा भिडत नाहीत. गझलतंत्र बाराखडीत आहेच, त्याचा लाभ घेता येईलच. पण अनेक ओळींचा आशय चांगला वाटला.

शुभेच्छा!

-सविनय
बेफिकीर!