...नसे गेले
मातुनी उतुनी असे गेले..
टाकुनी अपुले वसे गेले!
हारले! परि शाहणे झाले!
जिंकुनी आता ससे गेले!
वाट होती योग्य कोणाची?
मी असा अन ते तसे गेले!
चोरले सर्वस्व मी त्याचे..
शेवटी पुसुनी ठसे गेले!
हीच आहे गोष्ट हर्षाची..
शील अद्यापी नसे गेले!
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
शनि, 12/09/2009 - 11:05
Permalink
व्वा! वाट होती योग्य
व्वा!
वाट होती योग्य कोणाची?
मी असा अन ते तसे गेले!
हीच आहे गोष्ट हर्षाची..
शील अद्यापी नसे गेले!
हे दोन शेर फार आवडले. ससेपण आवडला.
राहिले डोक्यामधे पैसे
मोकळे होते, खिसे गेले
काय बोलू जीवनाबद्दल?
चांगले गेले, जसे गेले
-सविनय
बेफिकीर!
(ही गझल सुंदर झाली आहे मधुघटराव!)
क्रान्ति
शनि, 12/09/2009 - 11:11
Permalink
वा! आवडली गझल. हारले! परि
वा! आवडली गझल.
हारले! परि शाहणे झाले!
जिंकुनी आता ससे गेले!
खूप खास!
मधुघट
सोम, 14/09/2009 - 10:28
Permalink
धन्यवाद, बेफिकीर अन
धन्यवाद, बेफिकीर अन क्रान्ति!
बेफिकीरजी,
जीवनावरचा शेर असाच मीही लहिला आहे. पण प्रत्येक वेळी काय तेच रडगाणं लावायचं ह्या विचाराने इथे नाही दिला!
अजय अनंत जोशी
शुक्र, 18/09/2009 - 13:39
Permalink
चोरले सर्वस्व मी
चोरले सर्वस्व मी त्याचे..
शेवटी पुसुनी ठसे गेले!
चांगला शेर!
लहान वृत्तातील ससा पाहून मला माझा शेर आठवला.
ही माझी Gazal पहा.