गझल

का, कधी, कोणी फुलांचे घाव होते पाहिले ?
फक्त बाजारात त्यांचे भाव होते पाहिले

भाबड्या डोळ्यांत अंजन होउनी निर्घृणपणे
अनुभवांचे झोंबरे शिरकाव होते पाहिले

ते बरे होते विरोधक उघड ज्यांची दुष्मनी
मी स्वकीयांचे छुपे अटकाव होते पाहिले

प्रेमपत्रें, पंचनामा, कागदाला एकसे
लेखणीचे सर्व त्याने स्राव होते पाहिले

निवडताना फूल नाही चाखले मकरंद मी
'भृंग', त्यानेही तुझे, बस, नाव होते पाहिले

गझल: 

प्रतिसाद

भाबड्या डोळ्यांत अंजन होउनी निर्घृणपणे
अनुभवांचे झोंबरे शिरकाव होते पाहिले
आवडले.

ते बरे होते विरोधक उघड ज्यांची दुष्मनी
मी स्वकीयांचे छुपे अटकाव होते पाहिले

प्रेमपत्रें, पंचनामा, कागदाला एकसे
लेखणीचे सर्व त्याने स्राव होते पाहिले
वा! वा! गझल आवडली.

गझल आवडली.
डोळ्यातले अंजन ! वा मस्त

प्रेमपत्रें, पंचनामा, कागदाला एकसे
लेखणीचे सर्व त्याने स्राव होते पाहिले
क्या बात है! हा शेर मस्त जमून आलाय.
अटकाव ही चांगले आहे.
मक्त्यात तखल्लुस न घेता एखाद्या नव्या कल्पनेला वाव देता आला असता तर उत्तम. भृंग असल्याने नवनव्या कल्पना लढवण्यावर बंधन येते असे वाटते.

का, कधी, कोणी फुलांचे घाव होते पाहिले ?
फक्त बाजारात त्यांचे भाव होते पाहिले

मतला इतका लाजवाब आहे की पुढे अपेक्षा वाढतात. त्या पुर्ण होत नाहीत. तुम्च्याकडे भाषेची सहजता आहे हे मतल्यावरून कळते. मग तेवढ्याच ताकदीचे शेर आले तर अधीक मझा येईल.

का, कधी, कोणी फुलांचे घाव होते पाहिले ?
फक्त बाजारात त्यांचे भाव होते पाहिले
वा!

प्रेमपत्रें, पंचनामा, कागदाला एकसे
लेखणीचे सर्व त्याने स्राव होते पाहिले
वा!

दोन्ही शेर विशेष आवडले. अपेक्षापूर्ततेबाबत प्रसन्न शेंबेकरांशी सहमत आहे.

तेच कफिये , तेच ते  फुलांचे बाजार....

प्रेमपत्रें, पंचनामा, कागदाला एकसे
लेखणीचे सर्व त्याने स्राव होते पाहिले

अल्टी!!!

लेखणीचे सर्व त्याने स्राव होते पाहिले

अफाट.

प्रेमपत्रें, पंचनामा, कागदाला एकसे
लेखणीचे सर्व त्याने स्राव होते पाहिले

हा शेर विशेष आवडला....
बाकी प्रसन्न आणि चित्तरंजन यांच्या मताशी सहमत....