वामवेद


जो ध्रुव तो ढकलला मांडीवरून जातो
प्रत्येक मार्ग माझा वेदीवरून जातो


लपवून ठेवतो मी ते बोल अंतरीचे
(तांडा किती कवींचा वेशीवरून जातो)


शिंपीत राहतो मी निर्माल्य वाळलेले
तो ढीग पाकळ्यांच्या ओलीवरून जातो


नाहीच छापलेला पोथीत पंडितांच्या
'मम-वामवेद' त्यांच्या डोईवरून जातो


वाघावरून येती मज भेटण्यास त्यांना
आलिंगण्यास मीही भिंतीवरून जातो


मारून त्याच बाता येईल की सफाई
(अस्वस्थ हात अजुनी टोपीवरून जातो)


गझल: 

प्रतिसाद

पुन्हा एकदा एक शाब्दिक कसरत वाटते. शब्दांच्या पसारयात गझल शोधता सापडत नाही.

नाहीच छापलेला पोथीत पंडितांच्या
'मम-वामवेद' त्यांच्या डोईवरून जातो
छान शेर आहे

चित्तसाहेब,
जो ध्रुव तो ढकलला मांडीवरून जातो 
हे बरोबर आहे. जो ध्रुव असतो तो'च' मांडीवरून ढकलला जातो - असे!
इतरही शेर सोप्या पध्दतीने तयार आहेत.
उदा. "मम-वामवेद" च्या जागी "प्रत्येक शेर" अशी शब्दरचना होती.पण ते जरा जास्त झाले असते. म्हणून शालीत गुंडाळले.
हा,हा,हा, पण तुमचे शब्दको(जो?)डे शालीसह माझ्यापर्यंत पोचले, बरं का! :):),No regrets! मजा आला...
'No games, just sports!' - Nike {Shoes(जोडे?!) ha,ha,ha}
यापुढे शहाण्या मुलासारखे लिहिण्याचा प्रयत्न करीन.मग संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे लागणार नाही -अशी अपेक्षा आहे.;);)

जो ध्रुव असतो तो'च' मांडीवरून ढकलला जातो -
विसुनाना, हे वाक्य कसे पटकन कळले. असे त्या ओळीबद्दल माझे झाले नाही. क्षमा असावी. तुम्हाला जे म्हणायचे ते तुम्ही लिहिलेल्या त्या ओळीपेक्षा अधिक स्पष्ट कदाचित त्या वृत्तात जमणारे नाही.
मम वामवेद पेक्षा प्रत्येक शेर  चांगले. आपण जसे बोलतो तसा शेर असल्यास चांगले.