हवे मधे किती छान गारवा होता.....

हवे मधे किती छान गारवा होता
मना मधे किती शांत पारवा होता !.....१.

पळो पळी कशी सारखी मजा येते
तसा विस्तव नी आत गारवा होता !.....२.

कसे मला भिजवतात गार हे वारे !
मना मधे पक्षी गात मारवा होता.....३.

कुठे तरी विषादात सावली शोधू
जिथे बघू तिथे आज रानवा होता !.....४.

चला बघू नवे छान आरसे पाहू
जुना दिसे तरी, चेहरा नवा होता !.....५

असे किती जळावे ? असेच का व्हावे ?
मनो मनीं जळत एक काजवा होता !.....६.

` ख़लिश '-विठ्ठल घारपु रे /२-९-२००९.

गझल: 

प्रतिसाद

जुना दिसे तरी चेहरा नवा होता

व्वा! खलिशराव, हा शेर फारच आवडला.

बाकी जरा:

लयी तपास यारा तपास वृत्तेही
तृतीय शेर थोडा 'सही' हवा होता

सविनय
-'बेफिकीर'!

भूषणजी, धन्यवाद.
होय, वृत्तात लय घसरली खरी...मला ही जरा खटकत होती... हा शेर कसा राहिल ?

" न पंख फड्फडावे, न चोच उघडावी !
मना मधे पक्षी गात मारवा होता.....३."
` ख़लिश '- विठ्ठल घारपुरे /३-९-२००९ /००.३८.