कुठे तरी काही तरी जळत होते .....

कुठे तरी काही तरी जळत होते
मना मधे काही तरी सलत होते.....१.

नवी नवी नावे मला दिली त्यानीं
कधी मलम, ज़ख्म़ जुनी , हसत होते !.....२.

जरा कुठे बागे मधे बहर आला !
उन्हा मधे कोणी तरी रडत होते.....३.

चला जरा काही तरी नवे पाहू
नवे , जुने, स्वप्नात ही रडत होते !.....४.

कधी तरी माझ्या कडे बघा पाहू
असे तिथे कोणी तरी रटत होते.....५.

असे मद्य नाही दिले मला कोणी
फुलां मधे, काट्यांत ही गळत होते....६.

किती जुने हे फास, नी तरी ही का !
थवे पक्ष्यांचे नेहमी फसत होते ?.....७.

` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / ०१-०९-२००९.

गझल: 

प्रतिसाद

शेवटचे २ शेर फार आवडले!!
मद्य जे काट्यातही गळत होते - क्या बात है!!
फासही शेरही सुंदर!

मा. पुलस्ति, नमस्कार आणी प्रोत्साहना बद्दल धन्यवाद.लोभ असावा ही विनंती.
` ख़लिश '- विठ्ठल घारपुरे / ०१-०९-२००९.

पुलस्तींशी पूर्ण सहमत!

आपल्या गझलांमधील (जख्म वगैरे!) उर्दू ढंग आपला सातत्य राखतोच. 'द्विपदीं'ना पुन्हा क्रमांक देण्याचे 'प्रयोजन' आकळले नाही.

अभिनंदन! या गझलेचा आशय खूपच आवडला.