नवे ऋतू


जेव्हा नव्या ऋतूंनी बोलावले मला
माझ्याच सावल्यांनी वेडावले मला

जेव्हा दिल्या फुलांनी जखमा अजाणता,
हलकेच वेदनांनी जोजावले मला

घरट्यात ऊब, दाणा चोचीत घातला
फुटताच पंख त्यांनी धुडकावले मला

मी का, कसे, कधी अन् कोठून जायचे,
ते मार्ग प्राक्तनाने समजावले मला

आताच वादळांशी झुंजून थांबले
वाऱ्यावरी पुन्हा का भिरकावले मला?

कित्येकदा सुखाच्या मागून धावले,
प्रत्येकदा सुखाने हुलकावले मला

मी संभ्रमात अजुनी शोधीत उत्तरे,
आयुष्य हे कसे अन् का भावले मला?

गझल: 

प्रतिसाद

हा शेर व शेवटचा शेर आवडले.

धन्यवाद!

घरट्यात ऊब, दाणा चोचीत घातला
फुटताच पंख त्यांनी धुडकावले मला

मी का, कसे, कधी अन् कोठून जायचे,
ते मार्ग प्राक्तनाने समजावले मला

मी संभ्रमात अजुनी शोधीत उत्तरे,
आयुष्य हे कसे अन् का भावले मला?

----- शेर आवडले!
जयन्ता५२

जेव्हा नव्या ऋतूंनी बोलावले मला
माझ्याच सावल्यांनी वेडावले मला

आताच वादळांशी झुंजून थांबले
वाऱ्यावरी पुन्हा का भिरकावले मला?

मी संभ्रमात अजुनी शोधीत उत्तरे,
आयुष्य हे कसे अन् का भावले मला?

प्रचंड आवडले!

आताच वादळांशी झुंजून थांबले
वाऱ्यावरी पुन्हा का भिरकावले मला?
वा. सुखाचा शेरही फार आवडला. एकंदर गझल चांगली झाली आहे.

@शेवटचा शेर फार आवडला..!!

मी संभ्रमात अजुनी शोधीत उत्तरे,
आयुष्य हे कसे अन् का भावले मला?

धन्यवाद मंडळी.
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

वा! मक्ता आणि वादळाचा शेर मस्तच. आवडला.
सोनाली

भिरकावले, भावले हे शेर भावले.
कलोअ
चूभूद्याघ्या