संपत नाही


वाद घालणे संपत नाही
श्रेय लाटणे संपत नाही

ओळ वाचुनी संपली जरी
अर्थ लावणे संपत नाही

खूप भांडणे झाली पण हे
ओढ वाटणे संपत नाही

दूरचे दिवे मोहविणारे
दूर पाहणे संपत नाही

रान पेटले भोवती जरी
शांत राहणे संपत नाही

गझल: 

प्रतिसाद

वाव्वा. गझल आवडली. सगळेच शेर सहज, बोलके, झाले आहेत. अर्थ लावणे आणि शांत राहणे विशेष!

खूपच मस्त गझल! एकसे बढकर एक शेर!
खूप भांडणे झाली पण हे
ओढ वाटणे संपत नाही
मनापासून पटलं.
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

हा शेर आवडला.


धन्यवाद.
.केदार पाटणकर

सर्वच गझल आवडली.

दूरचे दिवे मोहविणारे
दूर *राहणे संपत नाही असे केले तर?

कलोअ
चूभूद्याघ्या

धन्यवाद.
.केदार पाटणकर

हा शेर नवाः
अवसेच्या रात्रीही माझे
चंद्र शोधणे संपत नाही

उत्तम गझल! प्रत्येक व नवाही शेर उत्तम!

अभिनंदन केदार!

माझ्या आधीच्या प्रतिसादातील 'टायटल' गेल्यामुळे कोणत्या शेराचा मी उल्लेख केला होता हे लक्षात येत नाही.

खूप भांडणे झाली पण हे
ओढ वाटणे संपत नाही

क्या बात है ! लाजवाब..!!

शांत राहणे, ओढ वाटणे विशेष अवडले. चंद्र शोधण्याचा नवा शेरसुद्धा आवडला.

पुर्ण गझलच एकदम मस्त.

वा: गझल सुंदरच! नवीन शेरही मस्त!