साकी मला तू असा, गळका जाम देऊ नको
गझल - ६.(क) : दुरूस्त आणी पुनः संपादित
साकी मला तू असा, गळका जाम देऊ नको
माझ्या कमी जिंदगीचा, इलज़ाम घेऊ नको....१.
कापूर ही जिंदगी माझी, फार नाही मुभा
निरांजनी व्यर्थ माला, हा डाम देऊ नको....२.
हे प्रारब्ध जाण की , मी आहे तुझा सोबती
निष्कारणी आशिकाचे, ईमान घेऊ नको....३.
मी ज्या घरी आज आहे, ते ना मला लाभले
बाकी तसा मी बरा आहे, मान देऊ नको....४.
तो मोले रडला, असा मी आरोप नाही करत
तू आज माझ्या चितेचे, सामान देऊ नको....५.
` ख़लिश '-विठ्ठल घारपुरे / १६-७-२००९ /१८.३८.
गझल: