वेगासवे मनाच्या, मी धावणार आहेवेगासवे  मनाच्या,  मी  धावणार  आहे
थोडे  करून  हेही,  मी  पाहणार  आहे.

हा  सूर  ताल  झाला,  या  अंगणात  माझ्या
ते  वाकडे  असेना,  मी  नाचणार  आहे.

ना  आस  आसवांची,  आता  मला  हवीशी
गंगाच  आटली  ती,  ना  वाहणार  आहे.

वांध्यात  जीव  थोडा,  जो  सैरभैर  झाला
श्वासात  घेत  त्याला,  मी  बाहणार  आहे.

तो  ध्रूव  आणि  तारे,  तेथे  असोत  सारे
जागा  अशीच  माझी,  ही  राहणार  आहे.

                               प्रज्ञा महाजन


गझल: 

प्रतिसाद

तो  ध्रूव  आणि  तारे,  तेथे  असोत  सारे
जागा  अशीच  माझी,  ही  राहणार  आहे.

व्वा! सुरेखच शेर केलात?

वांध्यात जीव झाला - छान शेर आहे.

सुंदर गझल!

अभिनंदन!

भूषण, त्वरित प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
                                                  प्रज्ञा.

खुश आ़म दीद....
वा ह वा ह,
छान गझल आहे.
हा  सूर  ताल  झाला,  या  अंगणात  माझ्या
ते  वाकडे  असेना,  मी  नाचणार  आहे.

तो  ध्रूव  आणि  तारे,  तेथे  असोत  सारे
जागा  अशीच  माझी,  ही  राहणार  आहे.
आ फ़ री न.....
` ख़लिश ' / १०-७-२००९.

मा. प्रज्ञा,

मतला आणि मक्ता आवडले. खूप छान ...


.केदार पाटणकर

आपण सगळेच असे धावायला लागल्यावर मारुतीने काय करावे?
तो  ध्रूव  आणि  तारे,  तेथे  असोत  सारे
जागा  अशीच  माझी,  ही  राहणार  आहे.
झकास!
कलोअ चूभूद्याघ्या

नि ३ बावा