आजही

काही विशिष्ट कारणाने १६ फेब्रुवारीनंतर पुन्हा येथे गझल लेखन सुरू करत आहे.



----------------------------------------------------------------------



शेवटी ओळीत आशय हेलकावे आजही

फेकलेल्या कागदांचा ढीग लागे आजही


माहिती होते तुला हे माहिती होते मला

'मीच का बोलायचे' हा पेच आहे आजही


कोण होतो, कोण जाणे काय मी केले तिथे?

ठेवले आहे घरावर नाव माझे आजही


योजना माझ्यातुझ्या आता कशा रेखायच्या?

काल मी होतो जिथे तेथेच आहे आजही


एकदा येशील का? फेरा पुरा करशील का?

होत ठोका मंद, जाताना विचारे आजही


तीच ही जागा, जमाना आपला नाही जरी

वाटते थोडे तुझ्यासाठी बसावे आजही


वाट झाली वेगळी की ताण येतो केवढा

एकदा 'होतो तसे' होऊ नव्याने आजही


गझल: 

प्रतिसाद

छान  आहे  गझल.
तीच ही जागा, जमाना आपला नाही जरी
वाटते थोडे तुझ्यासाठी बसावे आजही

वाट झाली वेगळी की ताण येतो केवढा
एकदा 'होतो तसे' होऊ नव्याने आजही

आवडले.
मतलाही  खास  आहे.

माहिती होते तुला हे माहिती होते मला

'मीच का बोलायचे' हा पेच आहे आजही Kya baat hai!

वाट झाली वेगळी की ताण येतो केवढा

एकदा 'होतो तसे' होऊ नव्याने आजही Bahot acche!

Ya donhi sheranche pahile misre sute pahile tari khup sunder ahet.

मा न्य व र,
आ फ री न.....
कोण होतो, कोण जाणे काय मी केले तिथे?

ठेवले आहे घरावर नाव माझे आजही

तीच ही जागा, जमाना आपला नाही जरी

वाटते थोडे तुझ्यासाठी बसावे आजही
हे  शेर  फार  छान आहेत.
लो भ  अ सा वा.
`खलिश' / ४-७-२००९.

योजना माझ्यातुझ्या आता कशा रेखायच्या?काल मी होतो जिथे तेथेच आहे आजही

वा!

तीच ही जागा, जमाना आपला नाही जरी

वाटते थोडे तुझ्यासाठी बसावे आजही

(ह्यावरून आठवले -
चोरी चोरी हमसे तुम आ कर मिले थे जिस जगह
मुद्दतें गुज़रीं पर अब तक वो ठिकाना याद है. )

वाट झाली वेगळी की ताण येतो केवढा

एकदा 'होतो तसे' होऊ नव्याने आजही

छान आहे!

सगळीच गझल आवडली, हे शेर खासच!
कोण होतो, कोण जाणे काय मी केले तिथे?
ठेवले आहे घरावर नाव माझे आजही
वाट झाली वेगळी की ताण येतो केवढा
एकदा 'होतो तसे' होऊ नव्याने आजही

क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

"घरावर नाव माझे " ..... मस्त