ग झ ल : तू कधी स्वप्नात माझ्या येशील का ? .....

३.


तू कधी  स्वप्नात माझ्या येशील का ?
काळजाच्या  आर्त भेटी घेशील का....१.


रात्र सारी जी  व्यथा मी  सांगोपतो
तू कधी  ती  मेजबानी  घेशील  का ....२.


फुल  हे  मी  आसवानी  जोपासले
ठाव  सारया  उपवनाचा  घेशील  का....३.


तू  शरानी  काळजाचा घेऊ नको
नेम हसर्या नेत्र युग्मी  घेशील  का....४.


जी ` खलिश ' सारया फुलानीं जोपासली
बाग  ह्याची नोंद  साधी घेईल  का .... ५.


` खलिश '  - अहमदाबाद / १९-०६-२००९.

गझल: