गझल : हात माझ्या काळ्जाला लावू नको.....

२.
हात माझ्या काळ्जाला लावू नको
हे बहाणे छेडण्याचे काढू नको....१.
  मी बरा  आहे, बरा राहू दे मला
  औषधे ही व्यर्थ सारी लावू नको....२.
ह्या चमनची ही पुराणी आहे प्रथा
बुलबुलानां आस वेडी लावू नको....३.
   तू नको शर त्या कमानी खेचू असा
   गुदगुल्या होतात अंगी खेळू नको....४.
ही `खलिश ' माझी च माला वाटे बरी
ती मजा तू वैद्य रूपे चोरू नको....५.
- `खलिश ' / अहमदाबाद / १९-०६-२००९.

गझल: