आज का?

आज का मुरलीधराच्या पावरीची साद नाही?
आज का राधे तुझ्याही पैंजणांचा नाद नाही?

शब्द झाले मूक; जागी नेत्रभाषा, स्पर्शभाषा
मौन झाले बोलके; मग सांग, हा संवाद नाही?

हाक माझी दशदिशांचा उंबरा स्पर्शून आली
आसमंतातून सा-या एकही पडसाद नाही

निर्गुणी भजने कुमारांची कधी ना ऐकिली तू,
भीमसेनांच्या स्वरांचा घेतला आस्वाद नाही!

सोड हे सुकणे, फुलांची पालखी दारात आली
स्वागताला हो पुढे, यासारखा आल्हाद नाही

या तुझ्या असण्यास वा दिसण्यास का जगणे म्हणावे?
खोलली त्याने कवाडे, अन् तुझा प्रतिसाद नाही!

आज छेडू या सुरांना, विसरुनी चिंता उद्याच्या
आजचे गाणे खरे, येथे उद्याला दाद नाही!

गझल: 

प्रतिसाद

भन्नाट...

वा... वा..!
सगळीच  गझल  सुंदर.
सगळे  शेर  आवडले. (भीमसेनाचा  सोडून. त्याचा  अर्थ  लागला  नाही.)

हा  शेर  हासिले गझल-

सोड हे सुकणे, फुलांची पालखी दारात आली
स्वागताला हो पुढे, यासारखा आल्हाद नाही

मस्त गझल..!! हे शेर आवडले.

शब्द झाले मूक; जागी नेत्रभाषा, स्पर्शभाषा
मौन झाले बोलके; मग सांग, हा संवाद नाही?

हाक माझी दशदिशांचा उंबरा स्पर्शून आली
आसमंतातून सा-या एकही पडसाद नाही     (फारच आवडला हा शेर.)

या तुझ्या असण्यास वा दिसण्यास का जगणे म्हणावे?
खोलली त्याने कवाडे, अन् तुझा प्रतिसाद नाही!

आज छेडू या सुरांना, विसरुनी चिंता उद्याच्या
आजचे गाणे खरे, येथे उद्याला दाद नाही!