रात आहे

हाय वेडी चांदणी ती माझिया ओठात आहे
लाघवी ही लाजणारी , प्रणयाची रात आहे...

प्रेम माझे त्या कळीला सांजवेळी सांगताना
भैरवीही आज येथे मारवा तो गात आहे

रोज रात्री आठवांत तुझ्या , अश्रूंशी बोलतो मी
अंतराचा भास हा पण अंतराची साथ आहे

शायराची शायरी तू , या मनाची मेनका तू ...
मेनकेचा गारवा तो माझिया श्वासात आहे

ह्या गुलाबी लावण्याला शब्द माझे लाजलेले
हृदयावर कोरलेली ही दिवानी बात आहे
गझल: 

प्रतिसाद

रचना तंत्रशुद्ध करावी. मतल्यातल्या खालच्या ओळीत वृत्त पाळण्यात आलेले नाही. साथ हे यमक घेता येणार नाही.