निघाल्या गवळणी पाण्याला....

निघाल्या गवळणी पाण्याला,
कशी खबर गेली कान्ह्याला?
 
जरा ओढणी घ्यावी चटकन,
कुणी सांगता का वार्‍याला?
 
मना थांब! अजुन कळत नाही,
धरावे कसे त्या पार्‍याला?
 
सुर तुझे भुलवती या विश्वा,
नको आवरु तू पाव्याला!
 
किती वेगळा शांत किनारा,
खळू दे एखाद्या तार्‍याला
 
असो 'वेळ' ही युगानुयुगे,
कसे 'हो' म्हणू तव जाण्याला
 
नजीकपण हे समजेल कुणा?
नको नाव वेड्या नात्याला
 
-निलेश

गझल: 

प्रतिसाद

असो 'वेळ' ही युगानुयुगे,
कसे 'हो' म्हणू तव जाण्याला
 
नजीकपण हे समजेल कुणा?
नको नाव वेड्या नात्याला
एक नंबर....
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!