शाप

ढगांना ओढते कित्येकदा मी
उपाशी झोपते कित्येकदा मी

"नको हे रोजचे ओसाड जीणे"
मनाशी बोलते कित्येकदा मी!

कधी माझा तुला आधार होता
घराला सांगते कित्येकदा मी

कळाले दानशूरांचे इरादे,
वयाला झाकते कित्येकदा मी

कुठे माझ्यात त्याचा शाप आहे,
स्वतःला जाळते कित्येकदा मी

-निलेश

-निलेश

गझल: 

प्रतिसाद

कधी माझा तुला आधार होता
घराला सांगते कित्येकदा मी
अप्रतिम शेर!
'दानशूर' ही खास.
शुभेच्छा.

कधी माझा तुला आधार होता
घराला सांगते कित्येकदा मी
खास शेर! गझल आवडली.क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

धन्यवाद!!

हे २ शेर मलाही फार आवडले!!

ढगांना ओढते कित्येकदा मी - ओढते हिंदी अर्थाने घेतले आहे का?
उपाशी झोपते कित्येकदा मी

कधी माझा तुला आधार होता
घराला सांगते कित्येकदा मी - वा वा!

कळाले दानशूरांचे इरादे,
वयाला झाकते कित्येकदा मी - सुंदर!

कुठे माझ्यात त्याचा शाप आहे,
स्वतःला जाळते कित्येकदा मी - लक्षात आला नाही.

घर व दानशूर हे शेर खूप आवडले.

तेच दोन शेर खूप चांगले आले आहेत. शुभेच्छा