कुणी माझ्यासवे यावे

इथे मी लाख सांगावे, कुणी ते का स्विकारावे ?
'कुणी ज्ञानासवे जावे, कुणी माझ्यासवे यावे'


नकारा झेलण्या तुझिया कधीचा मी तयाराहे
तिथे तू पोचली नाहीस तर मी काय मागावे ?


सदाचा घोळ हा माझा तिच्या प्रीतीत गुरफटला
असे मी काय केले की तिने गुंतेच सोडावे ?


मनाचा थांग माझ्या मी मनाने शोधतो आहे
तसा तो शोधण्या तू मन उधारीने तुझे द्यावे


पराचा होतसे कोणी, म्हणे कोकीळ मी आहे -
मिळे पिंडासवे भोजन, अता मयतासही गावे


अशी मी काय जादू साधली... निर्णय तिने द्यावा -
रहावी मूर्खता याची.. परी याला झुगारावे ?

गझल: 

प्रतिसाद

खुप  छान,

धन्यवाद रूपाली,
माझे नाव वाचूनही गझलवर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
प्रतिसाद कसा असतो हे महत्वाचे नाही. तो देणारा महत्वाचा.
कलोअ चूभूद्याघ्या

मनाचा थांग माझ्या मी मनाने शोधतो आहे
तसा तो शोधण्या तू मन उधारीने तुझे द्यावे
इथे मला उधारी आवडले.
सोप्या भाषेत लिहिण्याची आपली पद्धत चांगली आहे.
गोवित्रिकर

मनाचा थांग माझ्या मी मनाने शोधतो आहे
तसा तो शोधण्या तू मन उधारीने तुझे द्यावे

क्या बात है!क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}