सोडू नको


संपला रस्ता तरी चालायचे सोडू नको
पायवाटेने प्रसंगी जायचे सोडू नको

मी तुला नक्की कधी भेटेन हे सांगू कसे?
एवढे सांगेन की शोधायचे सोडू नको

कवडसे पडतील आपोआप माझ्या अंगणी
फक्त गच्चीवर सकाळी यायचे सोडू नको

काय झाले जर सभोती मोर दिसती शेकडो
तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको

पाहिजे तर फेक गेलेल्या क्षणांची लक्तरे
पण नव्याने सूत तू जमवायचे सोडू नको

तू न माझा तू नभाचा; मान्य हे आहे मला
बरस थोडेसेच पण झिरपायचे सोडू नको

त.टी : ही गझल मराठीगझल.कॉम च्या इ-मुशायर्‍यात ऐकता येईल


 

गझल: 

प्रतिसाद

मुशायर्‍यात ऐकली होतीच...परत आवडली.
कवडसे पडतील आपोआप माझ्या अंगणी
फक्त गच्चीवर सकाळी यायचे सोडू नको
हासिले गझल.
तू न माझा तू नभाचा; मान्य हे आहे मला
बरस थोडेसेच पण झिरपायचे सोडू नको
सुरेख.
एकंदर गझल छान.

पण नव्याने सूत तू जमवायचे सोडू नको  .... व्वा!
कलोअ चूभूद्याघ्या

 

भन्नाट...

तू न माझा तू नभाचा; मान्य हे आहे मला
बरस थोडेसेच पण झिरपायचे सोडू नको

खुप मस्त ...
पुन्ह एकदा वचयचि !!!
नहि सोदनार
हनुमन्त....


संपला रस्ता तरी चालायचे सोडू नको
पायवाटेने प्रसंगी जायचे सोडू नको
वा...
मी तुला नक्की कधी भेटेन हे सांगू कसे?
एवढे सांगेन की शोधायचे सोडू नको
वा... वा...
कवडसे पडतील आपोआप माझ्या अंगणी
फक्त गच्चीवर सकाळी यायचे सोडू नको
उत्तम...
पाहिजे तर फेक गेलेल्या क्षणांची लक्तरे
पण नव्याने सूत तू जमवायचे सोडू नको
सुरेख कल्पना.
गेलेल्या क्षणांची लक्तरे... छान!
...........


तुमच्या काही कल्पना चमकदार (चांगल्या अर्थाने वापरत आहे हा शब्द मी! ) असतात़; पण शेराच्या गोटीबंदपणासाठी आणि एकंदरच सफाईदारपणासाठी आणखी एखादा हात जरूर फिरवत जा... गझलेवरून!

मनापासून शुभेच्छा.
...........

पहिले तिन्ही शेर विशेष आहेत. फक्त गच्चीवर सकाळी यायचे सोडू नको फारच आवडले. अभिनंदन.

सर्वांनाच खूप धन्यवाद
तुमच्या काही कल्पना चमकदार (चांगल्या अर्थाने वापरत आहे हा शब्द मी! ) असतात़; पण शेराच्या गोटीबंदपणासाठी आणि एकंदरच सफाईदारपणासाठी आणखी एखादा हात जरूर फिरवत जा... गझलेवरून!
>>>
प्रदिपजी : प्रतिक्रियेबद्दल आभार. अजून सफाई यायच्या दृष्टीने मी नक्की प्रयत्न करीन पण त्या दॄष्टीने तुमच्या काही स्पेसिफिक सुचना असल्या तर नक्की सांगा