ओळख

रोज पटते मज नवी ओळख पुराण्या माणसांची...
मी अताशा रोज करतो ही हमाली वेदनांची!

 बोलसी का सारखे तू आणुनी डोळ्यांत पाणी?
धारही वाहून गेली आज तुझिया आसवांची!

 पाहिले माझ्याकडे परतून तू अन वाटले की...
काहिशी भरपाइ झाली तू दिलेल्या यातनांची!

ज्या क्षणी विझले दिवे माझ्यासमोरी पेटलेले..
संपली तेव्हाच गर्दी मागच्या त्या सावल्यांची!

भांडती का रोज बोके मिळवण्या लोणी इथे हे?
तुंबडी भरते अशाने रोज काही माकडांची!

गझल: 

प्रतिसाद

पाहिले माझ्याकडे परतून तू अन वाटले की...
काहिशी भरपाइ झाली तू दिलेल्या यातनांची!
    सुंदर शेर.
'दिवे'  आणि  'बोके'ही  मस्त.
पुलेशु.

पाहिले माझ्याकडे परतून तू अन वाटले की...
काहिशी भरपाइ झाली तू दिलेल्या यातनांची!
जियो.......

चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

ज्या क्षणी विझले दिवे माझ्यासमोरी पेटलेले..
संपली तेव्हाच गर्दी मागच्या त्या सावल्यांची!

उमदा शेर ! काबिल -ए- तारिफ !!

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

सर्वांना प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!

व्वा! सुंदर गझल!

रोज पटते मज नवी ओळख पुराण्या माणसांची... - सुंदर ओळ

 बोलसी का सारखे तू आणुनी डोळ्यांत पाणी? - सुंदर ओळ

 पाहिले माझ्याकडे परतून तू अन वाटले की...
काहिशी भरपाइ झाली तू दिलेल्या यातनांची!  - व्वा!

ज्या क्षणी विझले दिवे माझ्यासमोरी पेटलेले..
संपली तेव्हाच गर्दी मागच्या त्या सावल्यांची! - सुरेख आशय!

गझल आवडली. ( माकड व बोके सोडून! तो शेर वेगळाच आहे.)

बोलसी का सारखे तू आणुनी डोळ्यांत पाणी?
धारही वाहून गेली आज तुझिया आसवांची!

पाहिले माझ्याकडे परतून तू अन वाटले की...
काहिशी भरपाइ झाली तू दिलेल्या यातनांची!

खासच!

क्रान्ति
{रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर |
अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}