सल कशाचा आत कोठे खोल आहे


सल कशाचा आत कोठे खोल आहे
म्हणुन माझ्या हासण्याला ओल आहे

जर मला ना पाहिले मी अंतरंगी
तर पसारा साधनेचा फोल आहे

जग जसे जगतात सारे जीवजंतू !
पण अश्या जगण्यास काही मोल आहे?

कळत नव्हते का जगाचा खेळ झाला ?
मग निघाला तर्क "पृथ्वी गोल आहे"

मज म्हणाले काव्य माझ्या वेदनांचे
बघ तुझा सांभाळुनी मी तोल आहे
















गझल: 

प्रतिसाद

शेर आवडले...
जर मला ना पाहिले मी अंतरंगी
तर पसारा साधनेचा फोल आहे

जग जसे जगतात सारे जीवजंतू !
पण अश्या जगण्यास काही मोल आहे?

जियो दोस्त !!
सगळीच गझल मस्त !!
शेवटचे तीन तर एकदम खास !!

शेवटचा शेर फार आवडला!

दशरथ, जयश्री , पुलस्ती . .  धन्यवाद!
प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"