थाबं !


थाबं ! काही श्वास अजुन उरात बाकी  आहेत...
थाबं ! काही भास अजुन दुरात बाकी  आहेत...


 


जीवनाचे गीत जरिही सपंत आले असले तरिही,
ऍक!  काही बोल अजुन सुरात बाकी  आहेत...


 


उन्मळुन पडले वुक्षही सारे दुखा:च्या प्रवाहात या ,
बघ! काही मोजके लव्हाळे पुरात बाकी  आहेत...


 


सरत आले तारकांचे राज्यही या क्षितीजावरचे ,
अजुन  काही दिवे मिणमिणते घरात बाकी  आहेत...


 


खर तर आशेनहि आस सारी सोडलेली,
थांब! काही बळ अजुन धिरात बाकी  आहत...

गझल: