...जायचे कुठे ?

.................................
...जायचे कुठे ?
.................................


ही दुपार...भरदुपार...जायचे कुठे ?
सावली कुठे न गार...जायचे कुठे ?


सोबतीस पाहिजेच ना कुणीतरी ?
सोबतीविनाच यार...जायचे कुठे ?


संपलीच पावलांमधील चेतना....
घेउनी तुझा नकार...जायचे कुठे ?


`गाव हे अगत्यशील...`सांगतोस तू...
मात्र बंद दार दार...जायचे कुठे ?


एक वाट दाखवेल का कुणी मला...?
मार्ग भोवती हजार...जायचे कुठे ?


जायचे कुठे, तुला कळेल एकदा....
रोज रोज तू पुकार...`जायचे कुठे ?`


व्हायला तयार, वेळ लागतो किती...?
मी तयार...तू तयार...जायचे कुठे ?


यायचे  स्वतःकडेच  शेवटी  पुन्हा...
व्हायचे कुठे पसार...? जायचे कुठे ?


राहिलो तुझ्यावरीच मी विसंबुनी...
...आणि तूच हे विचार...`जायचे कुठे ?`


- प्रदीप कुलकर्णी 


 


 


 


  

गझल: 

प्रतिसाद

व्हायला तयार, वेळ लागतो किती...?
मी तयार...तू तयार...जायचे कुठे ?
यायचे  स्वतःकडेच  शेवटी  पुन्हा...
व्हायचे कुठे पसार...? जायचे कुठे ?
राहिलो तुझ्यावरीच मी विसंबुनी...
...आणि तूच हे विचार...`जायचे कुठे ?`
हे फार आवडले...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

प्रदीप, नेहमीप्रमाणेच सगळेच शेर रेखीव आणि छान आहेत.

एक वाट दाखवेल का कुणी मला...?
मार्ग भोवती हजार...जायचे कुठे ?

हा शेर वाचून आणि एकंदर जायचे कुठे ह्या अन्त्ययमकावरून

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला

हा शेर आठवला

मक्ता काय क्लास आहे. एकदम आवडला.
नेहमीप्रमाणेच आणखी एक सुरेख गझल.
सोनाली

सुंदर  गझल. नेहमीप्रमाणेच.

संपलीच पावलांमधील चेतना....
घेउनी तुझा नकार...जायचे कुठे ?
एक वाट दाखवेल का कुणी मला...?
मार्ग भोवती हजार...जायचे कुठे ?
व्हायला तयार, वेळ लागतो किती...?
मी तयार...तू तयार...जायचे कुठे ?
राहिलो तुझ्यावरीच मी विसंबुनी...
...आणि तूच हे विचार...`जायचे कुठे ?`
हे  आवडले.

पहिलाच शेर भरतीचा वाटतो.
व्हायला तयार, वेळ लागतो किती...?
मी तयार...तू तयार...जायचे कुठे ?
यायचे  स्वतःकडेच  शेवटी  पुन्हा...
व्हायचे कुठे पसार...? जायचे कुठे ?
राहिलो तुझ्यावरीच मी विसंबुनी...
...आणि तूच हे विचार...`जायचे कुठे ?`
व्वा! भगवद्गीतेतील चिरंतन विचार.
कलोअ चूभूद्याघ्या

प्रदीपजी अजून एक मस्त गझल
संपलीच पावलांमधील चेतना....
घेउनी तुझा नकार...जायचे कुठे ?
एक वाट दाखवेल का कुणी मला...?
मार्ग भोवती हजार...जायचे कुठे ?
यायचे  स्वतःकडेच  शेवटी  पुन्हा...
व्हायचे कुठे पसार...? जायचे कुठे ?
राहिलो तुझ्यावरीच मी विसंबुनी...
...आणि तूच हे विचार...`जायचे कुठे ?`
हे आवडले

दिलखुलास प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.