अंतराय

=====================


अजून  दु:ख  वेगळे  असेल  काय  यापुढे?
जगायचे  मला  अता  तुझ्याशिवाय  यापुढे..


अनोळखी  छटा  तुझ्या  मुखावरील  सांगते,
'अनोळखी' म्हणून  मी  तुला  हवाय  यापुढे


नको  पडायला  अता  नवीन  प्रश्न  आणखी;
नको  सुचायला  मला  नवे  उपाय  यापुढे


किती  पवित्र  दोर  हा  तिच्या  गळ्यात  बांधला..
तिचा  न  उंबर्‍यातुनी  निघेल  पाय  यापुढे !


दगावला  असेलही  मधाळ  बंध  आपला,
जगायला  हवा  निदान  अंतराय  यापुढे...


 


 


-ज्ञानेश.
=====================

गझल: 

प्रतिसाद

किती  पवित्र  दोर  हा  तिच्या  गळ्यात  बांधला..
तिचा  न  उंबर्‍यातुनी  निघेल  पाय  यापुढे !
कलाकृती म्हणून हा शेर फार आवडला... वास्तव (बर्‍यापैकी) असंच आहे हे खटकत असलं तरीही ते शेरातून ज्या प्रभावीपणे समोर आलंय, त्याला मनापासून दाद...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

अनोळखी  छटा  तुझ्या  मुखावरील  सांगते,
'अनोळखी' म्हणून  मी  तुला  हवाय  यापुढे.. क्या बात है!नको  पडायला  अता  नवीन  प्रश्न  आणखी;
नको  सुचायला  मला  नवे  उपाय  यापुढे.. सही!किती  पवित्र  दोर  हा  तिच्या  गळ्यात  बांधला..
तिचा  न  उंबर्‍यातुनी  निघेल  पाय  यापुढे !.. दर्दभरा शेर!ल गा ल गा ल गा.. हा तसा कठीण आहे रंगवायला.. पण उत्तम पेलला आहेस!पु. ले. शु.
-मानस६
किती  पवित्र  दोर  हा  तिच्या  गळ्यात  बांधला..
तिचा  न  उंबर्‍यातुनी  निघेल  पाय  यापुढे !
वाव्वा!  अनोळखीची गंमत आणि एकंदर गझल  आवडली. 

किती  पवित्र  दोर  हा  तिच्या  गळ्यात  बांधला..
तिचा  न  उंबर्‍यातुनी  निघेल  पाय  यापुढे !
कलोअ चूभूद्याघ्या

आनंदयात्री, मानस, चित्त, अजय... प्रतिसादाबद्दल  आभारी  आहे.
@अजय- नुसता  शेर  डकवून  "कळावेलोभअसावाचूकभूलद्यावीघ्यावी" लिहिल्यानंतर  आम्ही  काय  समजावे? शेर  आवडला  की  नाही?
चूकभूल  करा  तरी  आधी. म्हणजे  ती  नंतर  देता-घेता  येईल..! :)

अंतराय आणि अनोळखी हे शेर फार आवडले!

आपली पूर्वीची लिहिण्याची पद्धत आणि सध्याची यामध्ये नक्कीच फरक आहे. मी मात्र पूर्वीपासून असेच लिहितो आहे.
चुकीच्या लोकांचा सहवास आपल्याला लागला आहे काय सध्या?
चूकभूल  करा  तरी  आधी. म्हणजे  ती  नंतर  देता-घेता  येईल..! :)
म्हणजे काय? इथे काय आम्ही चकाट्या पिटायला येतो काय?
 

@जोशी  साहेब-
एवढे  हमरीतुमरी वर  का  येताय?
तुमच्या  प्रतिसादाबद्दल  हा  प्रश्न  मी  कधीचाच  विचारणार  होतो. नुसते  एका  शब्दात  छान/चांगले/बरे/वाईट  लिहायला  काय  हरकत  आहे? प्रत्येक  वेळी  "चूभूद्याघ्या"कशासाठी?
आता  प्रतिसादात  काही  लिहिलेच  नाही, तर  चूकभूल  काय  होणार?
तुम्ही  कसा  प्रतिसाद  द्यायचा हा  सर्वस्वी  तुमचा  प्रश्न  आहे. तुमचे  स्वातंत्र्य आहे  ते.
पण  वरील  प्रश्न  मनात  असल्याने  मी  अत्यंत  खेळकरपणे  तो  प्रश्न  विचारला  होता. काहीतरी  असेच  खेळकर  उत्तर  मला  त्यातून  हवे  होते.
आपली पूर्वीची लिहिण्याची पद्धत आणि सध्याची यामध्ये नक्कीच फरक आहे
म्हणजे  काय?
चुकीच्या लोकांचा सहवास आपल्याला लागला आहे काय सध्या?
ही  पर्सनल  कमेंट  कशासाठी?
जोशी  साहेब, मी  तुम्हाला  मित्र  समजत  होतो.
माफ  करा  मला.
 
 

अजून  दु:ख  वेगळे  असेल  काय  यापुढे?
जगायचे  मला  अता  तुझ्याशिवाय  यापुढे..

सुं द र...

अनोळखी  छटा  तुझ्या  मुखावरील  सांगते,
'अनोळखी' म्हणून  मी  तुला  हवाय  यापुढे

कल्पना छान...
पण `हवा आहे`चे `हवाय` यमकासाठी केले आहे...संपूर्ण गझलेत तेवढा एकच शब्द बोलीभाषेतील आहे. तो खटकतो.


नको  पडायला  अता  नवीन  प्रश्न  आणखी;
नको  सुचायला  मला  नवे  उपाय  यापुढे
छान...
किती  पवित्र  दोर  हा  तिच्या  गळ्यात  बांधला..
तिचा  न  उंबर्‍यातुनी  निघेल  पाय  यापुढे !

ओहो ! सुरेख...

दगावला  असेलही  मधाळ  बंध  आपला,
जगायला  हवा  निदान  अंतराय  यापुढे...
- दुसरी ओळ उत्तम. बंध दगावणे....अयोग्य वाटते.

चांगले लिहिता तुम्ही. लिहीत राहा. मनापासून शुभेच्छा.

दगावला  असेलही  मधाळ  बंध  आपला,
जगायला  हवा  निदान  अंतराय  यापुढे...
संपुर्ण गझल आवडली, त्याचबरोबर गझलेचे शीर्षक ही छान दिले आहेस.

किती  पवित्र  दोर  हा  तिच्या  गळ्यात  बांधला..
तिचा  न  उंबर्‍यातुनी  निघेल  पाय  यापुढे !आई गं !!

प्रसन्न शेंबेकर
 "तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

झानेश,
तुमच्या गझला मस्त असतात.. आवडतात मला
पवित्र दोर सहीच...
मतला पण आवडला

गझल चांगली जमली आहे. पाय व उपाय विशेष.

व्वा...... मस्त !!
अनोळखी, पवित्र दोर तर सहीच !! गझल आवडलीच !!

वाह.. संपुर्ण गझल सुंदर!!

वाह.. संपुर्ण गझल सुंदर !!