चान्दणी

मनास वाटे कसे जगावे तुझ्याविना
तरी उठवतेच फायदे हे तुझ्याविना


नको उगा औषधे पाठवू क्षणोक्षणी
तशी मी बरी सदाच असते तुझ्याविना


नकोस डोळे करूस मोठे नि किलकिले
नजर तुझी मज रहा सांगते तुझ्याविना


नकोच गिरवूस चांदण्यांची मुळाक्षरे
रिकामेच हे बरे उतारे तुझ्याविना


असे माहिती मिळे तेजही तुझ्यामुळे
तरी चांदणी नभी चमकते तुझ्याविना

गझल: