बहरासंगे फुलणार्‍या सर्व फुलांची मी कोण लागते


मतला नाही, प्रकाशित करू नये
 
नकोच असतो  विचार ज्याचा, नकोच असते गाठभेठही
सुरू  असतात दिखाव्याला त्या शत्रूची  कशी स्वागते?

जमले सारे  आनंदाने म्हणजे  त्यांचे पटते ?..नाही...
त्यांचा शत्रू  एकच असतो  मग  प्रासंगिक सख्य जागते
 
झाड बहरता,पक्षी येती  ..पण वठलेले  झाड एकटे
लाभ संपता असेच घडते..  गर्दी  सगळी कशी पांगते ?...

टळले नाही कोणासुद्धा  शिखरावरून खाली येणे
तो झगमगाट आहे कळले, आता जपून मीच वागते 

भाजीपाला ,फळे ,अन्नधान्य,  फक्त वाढते..असे वाटते
खिशात पैसा नसतो जेव्हा ही माणुसकी पण महागते

ही पक्क्वांनांची  सगळी चित्रे  जरी टांगली चहूकडे
आवडते ते  नुसते  बघून  कुणाची भूक कधी भागते?

-सोनाली जोशी

गझल: