तू गेल्यावर

           मी स्वप्न तुझे प्रेमाचे गुलजार उधळले होते!
           तू गेल्यावरती मग का हे रक्त उसळले होते?

            तू गेल्यावरती आले मज गंध प्रेमकुसुमांचे
            कळले न मला मी केव्हा गजरे चुरगळले होते!

            माझाच वेगळा रंग मी मिरवित होतो तेव्हा
            पण रंग तुझे अन माझे केव्हाच मिसळले होते!

            मी अंगावरच्या जखमा कुरवाळित बसलो होतो
            तेव्हाच जख़्म हृदयाचे अपरोक्ष चिघळले होते!

            तू गेल्यावरती दिधला मी दोष तुझ्या असण्याला
पण्........अस्तित्व तुझे माझ्यात तेव्हा विरघळले होते!

गझल: 

प्रतिसाद

           छान्...च
             मी स्वप्न तुझे प्रेमाचे गुलजार उधळले होते!
           तू गेल्यावरती मग का हे रक्त उसळले होते?

            तू गेल्यावरती आले मज गंध प्रेमकुसुमांचे
            कळले न मला मी केव्हा गजरे चुरगळले होते!

            माझाच वेगळा रंग मी मिरवित होतो तेव्हा
            पण रंग तुझे अन माझे केव्हाच मिसळले होते!

माझाच वेगळा रंग मी मिरवित होतो तेव्हा
पण रंग तुझे अन माझे केव्हाच मिसळले होते!
छान. तरी म्हणताना जरा अडचण होते आहे असे वाटते.
कलोअ चूभूद्याघ्या

जरासे विशद करून सांगा ना
कळले नाही मला

अर्थात शेवटच्या कडव्यात 'पण' हा मनातल्या मनात वाचायचा आहे!
नाहीतर तो बसत नाहीये!

हा शेर आवडला.
माझाच वेगळा रंग मी मिरवित होतो तेव्हा
पण रंग तुझे अन माझे केव्हाच मिसळले होते!